जुलैत २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी आदेशाची प्रतिक्षा
जळगाव : जिल्ह्यात आगामी जुलै महिन्यात चोपडा, यावल, रावेर या तालुक्यातील सुमारे २१ ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतीबाबत (Gram panchayat election) निवडणूक आयोग (Election Commission) काय आदेश देते याबाबत जिल्हा प्रशासनाला प्रतिक्षा आहे. यानिवडणूकांसाठीची तयारी मार्चपासूनच सुरू होण्याची गरज होती. मात्र अद्यापपर्यंत आयोगाचे काहीच आदेश न आल्याने जिल्हा परिषदेने (Jalgaon zilha parishad) या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जिल्ह्यासह राज्यात कोरोना महामारीमुळे सर्वच प्रकारच्या निवडणुकांना स्थगिती आहे. मात्र आता कोरोनाची स्थिती आटोक्यात येत आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकांच्या तयारी बाबत आदेश काढलेले नाहीत. यामुळे जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करावी लागणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.