आळंदीत नगराध्यक्षांसह तब्ब्ल ३६ वारकरी करोना बाधित
आळंदी - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 336वा पालखी प्रस्थान सोहळा शुक्रवारी (2 जुलै) होणार असून, यासाठी मोजक्याच निमंत्रितांना आमंत्रित करण्यात आल्याचे पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांनी सांगितले. शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करून ही वारी आधार वारी म्हणून साजरी करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तमाम वारकरी बांधवांना केले आहे.
यातच कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांना बंधनकारक आहे. कोरोनाचे वाढते संकट, रोज सापडणारे नवनवीन स्ट्रेन, तिसऱ्या लाटेचा दिलेला इशारा अशा परिस्थितीत आषाढी पायी वारीला यंदाही परवानगी देण्यात आली नाही. केवळ मानाच्या दहा महत्वाच्या पालख्या आहेत त्यांना बसने परवानगी देण्यात आली आहे.
तर देहू-आळंदी पालखीबरोबर 100 जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली. त्यातच आता आषाढी वारीत कोरोनाचा शिरकाव झाल्याचं समोर आलं आहे. विकास ढगे पाटील या बाबत माहिती दिली आहे की,'या सोहळ्याला उपस्थित असलेल्या 368 वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यातील 37 वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सांगितले आहे.
राज्य सरकार आदेशानुसार आषाढ शुद्ध दशमीला १९ जुलैला माउलींच्या चलपादुका लालपरीतून पंढरपूरीला विठुरायाच्या भेटीला घेऊन जाणार आहेत. दरम्यान अलंकापुरीत संचारबंदी लागू असल्याने समाधी मंदिर बंद आहे. त्यामुळे प्रस्थान सोहळ्यास परवानगी शिवाय कोणीही येऊ नये असे आवाहन आळंदी सोहळा प्रमुख विश्वस्त अॅड.विकास ढगे - पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.