जयवंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत झालेल्या संजय गांधी निराधार योजनेतील मंजुर झालेल्या पत्रांचे वाटप अध्यक्षा ज्योती आदाटे आणि समिती सदस्य यांच्या हस्ते पार पडला
जयवंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत झालेल्या संजय गांधी निराधार योजनेतील मंजुर झालेल्या पत्रांचे वाटप अध्यक्षा ज्योती आदाटे आणि समिती सदस्य यांच्या हस्ते पार पडला 103 मंजुर झालेल्या पत्रांचे वाटप करताना ज्योती आदाटे म्हणाल्या कि समिती स्थापन होऊन 8 महिने झाले या 8 महिन्यात 400 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देऊ शकलो यामध्ये विधवा परित्यक्ता घटस्फ़ोटीता प्रौढकुमारिका दिव्यांग वृध्द निराधार दुर्धर आजारी कमी उंची असलेल्या लोकांचा समावेश होता तसेच या महामारीच्या काळात अनेक कुटुंब उजडली आहेत अनेक महिलांना वैधव्य आले आहे अनेक वृध्द निराधार झाले आहेत त्यामुळे लाभार्थाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे तात्काळ त्यांचे प्रकरण मंजुर करून त्यांना दिलासा देण्याचे काम अशा परिस्थितीत सुध्दा आमचे प्रशासन व समिती जीवाची पर्वा न करता सक्रिय रित्या करीत आहे त्यामुळे जे कोणी लाभार्थ्यी या योजनेचा लाभ घेण्यापासुन वंचित असतील त्यांनी तातडीने याचा लाभ घ्यावा व स्वत प्रस्ताव तयार करण्याचा प्रयत्न करावा कोणत्याही दलालामार्फत प्रस्ताव तयार करू नये जेणेकरून त्यांचा विनाकारण वेळ आणि पैसा वाया जाईल हे प्रस्ताव करणे फार सोपे आहे ते शिकुन घ्यावे समिती आंणि प्रशासनाकडुन याचे पुर्णपणे मार्गदर्शन मिळेल तसेच ज्यांचे प्रस्ताव मंजुर झालेत त्यांना ज्योती आदाटे नी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच त्यांनी पुढील आर्थिक व्यवहार अगदी निर्भयपणे करावा कोणत्याही दलालाकडे बॅकेचे पासबुक देऊ नये स्वतः दरमहिन्याला बँकेतून पैसे काढावे अन्यथा पेन्शन योजनाच बंद होते तसेच स्वतःचे पासबुक दलालाकडे असतात हे लक्षात आल्यामुळे त्याचा पुन्हा सर्वे होणार आंणि बॅकेची पासबुक त्यांच्याकडे नसले तर त्याची चौकशी होणार हे ठणकावून सांगितले तसेच आपण लाभ घेण्यास पात्र आहोत का याची खातरजमा करूनच प्रस्ताव टाकावा तसेच दारिद्र्यरेषेखालच्या यादीत नाव असलेल्या माझ्या विधवा भगिनीला तात्काळ 20000/_देण्याची योजना आहे हा प्रस्ताव पतीच्या निधनानंतर 3 वर्षाच्या आत सादर करणे बंधनकारक आहे पण तिच्या पतीचे निधनसमयी वय 59 च्या आत असेल तरच अशा महिलेला ही तात्काळ मदत मिळण्याची योजना आहे त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी आप्पासाहेब ढोले संतोष भोसले भगवानदास केंगार तसेच तलाटी एम आय मुलाणी व एस आय खतिब लिपिक सचिन गुरव आणि सहाय्यक प्रियांका तुपलोंडे ई उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.