'कोल्हापुरातले निर्बंध 5 दिवसांसाठी शिथिल' सरकारचा दिलासा
कोल्हापूर : कोरोनाची दुरसी लाट जरी ओसरत असली तरी राज्याला तिसऱ्या लाटेचा फटका बसू नये म्हणून मुंबई सह अन्य भागात अजूनही नियम शिथिल केले गेले नाही आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने अद्यापही संपूर्ण दिवस उघडण्यास परवानगी नाही.कोल्हापूरात रूग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध कडक होते आता मात्र कोल्हापूर मध्ये 5 दिवसांसाठी निर्बंध हटवले आहेत.
कोल्हापुरात शहरातले निर्बंध हटवले
कोल्हापुरात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आठ दिवसासाठी शहरातले निर्बंध हटवले आहेत. सोमवार म्हणजेच 5 जुलैपासून अत्यावश्यक सेवांबरोबरच इतर सर्व दुकाने आणि आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे.
कसे असतील नवीन नियम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या परवानगीने सोमवार 5 जुलै ते शुक्रवार 9 जुलै या कालावधीमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी 4 या वेळासाठी देण्यात आली आहे. 5 दिवसानंतर पुन्हा कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. त्यामुळे कोल्हापूर शहरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये,सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत अशी विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.
व्यापारी आपल्या कुटुंबियांनासोबत सामील सलग तीन महिन्यनाचा लॉकडाऊनमुळे, वेगवेगळ्या खर्चांमुळे व्यापारी मेटाकुटीला आला आहे. सरकार कडे मागणी करूनही काहीच होत नसल्याने व्यापारी वर्ग आता संतापला आहे. रविवारपर्यंत कोणताही निर्णय आला नाही तर सोमवारपासून दुकाने सुरु करण्याची घोषणा व्यापाऱ्यांनी केली आहे. व्यापाऱ्यांच्या बरोबर बसून निर्णय घ्यावा यासाठी कोपरा सभा आयोजित केली असून या कोपर्या सभेत व्यापारी आपल्या कुटुंबियांनासोबत सामील होणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.