Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आज मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; महाराष्ट्राला किती मंत्रिपदं?

 आज मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; महाराष्ट्राला किती मंत्रिपदं?

केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रीमडळाचा आज विस्तार होणार आहे. हा मंत्रीमंडळ विस्तार संध्याकाळी ६ वाजता पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात अनेक नेत्यांची वर्णी लागणार आहे असल्याची माहिती मिळत आहे. ज्या नेत्यांना मंत्री केलं जाणार आहे असे सगळे नेते दिल्लीत दाखल झालेत. काहीजण आज दुपारपर्यंत दाखल होतील. महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे, खासदार कपील पाटील हे दिल्लीत दाखल झाले आहेत.

सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे. मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात १७ ते २२ मंत्री शपथ घेतील. या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे, अशी माहिती मिळतेय.

महाराष्ट्रातून कुणाला लॉटरी?

मोदींच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर नारायण राणे, प्रीतम मुंडे, उदयनराजे भोसले, हिना गावित यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. मंत्रिमंडळात सामील होण्याची चर्चा असणारे नेते आता हळूहळू दिल्लीत पोहोचू लागले आहेत, राज्यातून खासदार नारायण राणे दिल्ली पोहोचले आहेत. राज्यातील इतर अनेक नावांची चर्चा आहे. कपिल पाटील, हिना गावित, रणजीत निंबाळकर, भागवत कराड यांची नावे देखील मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. कपिल पाटील सध्या दिल्लीत आहेत.

या राज्यांना महत्व?

मंत्रीमंडळाच्या विस्तारात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल अशा सहा राज्यांना जास्त महत्व दिलं जाणार आहे. कारण पुढच्या वर्षभरात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणूका आहेत. त्यामुळे साहजिक मंत्रीमंडळात तिथल्या नेत्यांना स्थान देऊन विधानसभेची गणितं दुरुस्त करण्याची ही एक संधी साधली जातेय. महाराष्ट्रात कधी कुठली राजकीय स्थिती निर्माण होईल याचा अंदाज नाही त्यामुळेच महाराष्ट्रातूनही दोन एक नेत्यांना मंत्रीपदाची संधी असेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.