डॉक्टरांचा अभ्यासक्रम ड्रग माफिया तयार करतात, बाबा रामदेव यांची पुन्हा ऍलोपॅथीवर टीका
योगगुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा ऍलोपॅथी डॉक्टरांवर टीका केली आहे. ऍलोपॅथीचा ड्रग माफियाशी संबंध असल्याचा आरोप बाबा रामदेव यांनी केला आहे. तसेच योगामुळे अनेक गंभीर आजार बरे होतात असा दावाही बाबा रामदेव यांनी केला आहे.
उत्तर प्रदेश गाजियाबाद जिल्ह्यात बाबा रामदेव यांनी पतंजलि योगपीठ केंद्राचे उद्घाटन केले. तेव्हा बाबा रामदेव म्हणाले की, ड्रग माफिया ऍलोपॅथी डॉक्टरांचा अभ्यासक्रम तयार करतात. हाच अभ्यासक्रम डॉक्टरांना शिकवला जातो. ऍलोपॅथी आणि ड्रग माफियांचा जवळचा संबंध असून डॉक्टरांना जे संशोधन शिकवले जाते ते सुद्धा ड्रग इंडस्ट्री तयार करते असेही बाबा रामदेव म्हणाले. या वक्तव्यामुळे बाबा रामदेव पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.
ऍलोपॅथी एक मूर्ख आणि बिनकामाचे विज्ञान आहे असे बाबा रामदेव यांनी म्हटले होते. तसेच रेमडेसिवीर, फेविफ्लू आणि डीसीजीआयने मंजुरी दिलेल्या दुसऱ्य़ा औषधांमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या विधानाने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि आरोग्य मंत्र्यांच्याच प्रतिष्ठेला आव्हान दिले होते. त्याचबरोबर लाखो लोकांचे जीव धोक्यात टाकले आहे. सरकारने रामदेवबाबांविरुद्ध कारवाई न केल्यास आपण कायदेशीर कारवाईचा मार्ग पत्करणार असल्याचा इशाराही आयएमएने दिला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.