Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्तर ४ नुसार जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास 12 जुलै पर्यंत मुदतवाढ

 स्तर ४ नुसार जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास 12 जुलै पर्यंत मुदतवाढ


सांगली, दि. 3: कोविड पॉझिटीव्हीटी दरानुसार राज्यातील जिल्ह्यांना राज्य शासनाच्या आदेशान्वये 1 ते 5 स्तर मध्ये विभागले आहे. राज्य शासनाकडील आदेशान्वये फक्त RTPCR चाचणी अहवालानुसार कोविड पॉझिटीव्हीटी दर निश्चित करण्याच्या सूचना आहेत. दि. 26 जून 2021 व दि. 3 जुलै 2021 रोजी संपणाऱ्या सलग दोन आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के पेक्षा जास्त व 20 टक्के पेक्षा कमी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्तर 4 प्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास दि. 12 जुलै 2021 रोजीचे पहाटे ५ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.