Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार फंडातून त्रिकोणी बागेत शहीद स्मारकाचे बांधकाम व सुशोभीकरण शुभारंभ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार फंडातून त्रिकोणी बागेत शहीद स्मारकाचे बांधकाम व सुशोभीकरण शुभारंभ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.


सांगली 2 जुलै 2021:  उद्यान विकसित करण्याची नागरिकांची मागणी आता पूर्ण होणार असं नागरिकांना एक चांगले विरंगुळ्याचे ठिकाण तयार होईल असे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या आमदार फंडातुन महापालिका क्षेत्रातील प्रभाग १७ मधील त्रिकोणीबाग विकसित करण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी आ. गाडगीळ बोलत होते. आर्किटेक्ट समीर गोखले हे उद्यान विकसित करून येथे शहीद स्मारका बांधकाम करणार आहेत यावेळी सांगली जिल्हा भारतीय माजी सैनिक संघटना यांनी गेल्या २० वर्षांपासून प्रयत्न केले होते. आमदार सुधीर गाडगीळ यांनी तात्काळ आमदार फंडातून मंजूर करून त्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला सांगली जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक जवान शहीद झाले असून. जिल्ह्यातील शहीद जवानांची नावे येथे कोरण्यात येणार आहेत यानिमित्ताने त्यांची स्मृति जागी होणार असून या कामासाठी १७ लाख रु.खर्च करण्यात येणार आहे तसेच याकामासाठी अजून काही मदत लागल्यास अजून मदत करण्याचे आश्वासन आमदार गाडगीळ यांनी दिले यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्षा व माजी सैनिक यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांचा सत्कार घेऊन या चांगल्या कामाबद्दल मदत केल्याबद्दल आभार मानले.

यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व नगरसेवक शेखर इनामदार, माजी महापौर संगीता खोत, माजी महापौर गीता सुतार, माजी सैनिक संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षा श्रीमती मीनाक्षीताई महाडिक, ब्रिगेडियर दीपक पाटील, कर्नल कल्याणी कर्नल हारुगडे, सुभेदार मेजर रमेश चव्हाण, कॅप्टन लक्ष्मण शिंदे, कॅप्टन सलीम मुजावर, संपतराव निंबाळकर, नगरसेविका रोहिणी पाटील, नगरसेविका गीतांजली ढोपे-पाटील, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, माजी नगरसेवक विठ्ठल खोत, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, गणपती साळुंखे, राहुल ढोपे पाटील आदी माजी सैनिक व मान्यवर तसेच  प्रभागातील नागरिक उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.