सन 2019 मध्ये आलेल्या महापुराने सांगली शहराला वेढ़ल्याने मुर्ती पाण्यात विरघळली. पण माती जागेवर तशीच राहिली. आणि त्याच राहिलेल्या मातीपासून सुरेख, आकर्षक, सुंदर, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गणेशमुर्ती
आ. स्व. पै. संभाजी पवार (आप्पा ),यांच्या कुशल मार्गदर्शना खाली सन 1972 मध्ये विजयंत मंडळाची स्थापना झाली. सन 1972 साली सांगलीतील सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार सत्तीकर यांनी ही मुर्ती बनवली.श्रींची मुर्ती गणपती उत्सवामध्ये त्याची प्रतिष्ठापना करुन नवव्या दिवशी विसर्जन मिरवणूक काढली जाते. पण ही श्रींची मुर्ती परत सत्तीकर यांचे जागेत ठेवली जाते. वर्षभर असंख्य भाविक दैनंदिन या मूर्तिचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत. सन 1972साली कृष्णा नदीतील गाळ माती व शाडू पासून मुर्ती बनवण्यात आली आहे. सन 2019 मध्ये आलेल्या महापुराने सांगली शहराला वेढ़ल्याने मुर्ती पाण्यात विरघळली. पण माती जागेवर तशीच राहिली. आणि त्याच राहिलेल्या मातीपासून सुरेख, आकर्षक, सुंदर, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गणेशमुर्ती मूर्तिकार सत्तीकर यांनी तयार केली. सत्तीकर यांनी अतिशय परिश्रम घेऊन पुन्हा विजयंत मंडळाची हुबेहूब मुर्ती बनवली.
पुन्हा विजयंत मंडळाची गणेशमुर्ती तयार झालेने भविकांचे लक्ष वेधले जात आहे. याच मारुती चौकातील विजयंत गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना युवा नेते पृथ्वीराज पवार यांचे हस्ते करणेत आली. मंडळाचे 50वे वर्ष आहे. या 50 वर्षात विजयंत मंडळाने अनेक नामांकित व दिग्गज कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी प्राप्त करुन दिली. अनुप जलोटा. तीजनबाई, मेवाबाई सफेरा, तेरीताली नृत्य, येसावकर पार्टी, प्रल्हाद शिंदे, सुरेखा पुणेकर, माया जाधव, छाया माया खुटेगाव कर, उषा मंगेशकर, दीपाली सय्यद, स्वप्निल बांदोडकर यांच्यासारख्या अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी दिली. श्रींची भव्य मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, कार्यक्रम ही मंडळाची खाशीयत. गेल्या 3 वर्षा त आलेल्या महापूर व कोरोना सारख्या महामारीमुळे सर्व कार्यक्रमांना फाटा देऊन साधेपणाने उत्सव साजरा करुन प्रशासनाला सहकार्य करीत आहोत. श्रींच्या प्रतिष्ठापणेवेळी राजू बावडेकर, सचिन घेवारे, विलास शिंदे, बटुदादा बावडेकर, सुरेशदादा पाटील. आनंद परांजपे, नगरसेवक युवराज बावडेकर, नगरसेवक सुबराव मद्रासी, विजय साळुंखे, रमेश बावडेकर, कुंदन पवार, सतीश पवार, राजू भावी, चंदू सूर्यवंशी, अभय खाड़ीलकर, दिनेश संमुख, सुनिल पवार, विशाल पवार, बाळ रजपुत,दिपक बावडेकर,यांचेसह मंडळाचे आजी माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

