चिलीचा आंतरराष्ट्रीय मास्टर अबार्का गोंझालेझ ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता भारताचा फिडे मास्टर आर्यन वार्षणेय वयोगटात सर्वोत्कृष्ठ
पुरोहित चेस अकॅडमी, सांगली आणि चेसनट अकॅडमी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या गेलेल्या ऑनलाईन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेमध्ये भारतासह कजाखिस्तान, अर्जेंटिना, जॉर्जिया, इराण, युक्रेन, अर्मेनिया, उझबेकिस्तान, रशिया यांसह अनेक देशातील ग्रँडमास्टर्स, आंतरराष्ट्रीय मास्टर्स, फिडे मास्टर्स सहभागी झाले होते. चिलीचा आंतरराष्ट्रीय मास्टर अबार्का गोंझालेझ हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने १३ गुणांसह विजेतेपद पटकावले. बेलारूसचा ग्रँडमास्टर अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज हा १२.५ गुणांसह उपविजेता ठरला. अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय मास्टर क्विरोगा फॅकुंडो यास १२ गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. रशियाचा फिडे मास्टर इगोर वखलामोव्ह यास १२ गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. कोलंबियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर क्विसेनो एस्टेबान यास १२ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले. भारताचा फिडे मास्टर आर्यन वार्षणेय यास ११ गुणांसह वयोगटातील सर्वोत्कृष्ठ स्थान प्राप्त झाले.
बुद्धिबळ प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली गेली. तांत्रिक पंच म्हणून सारंग विवेक पुरोहित, दीपक वायचळ, शार्दूल तपासे आणि चंद्रशेखर कोरवी यांनी काम पाहिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
