Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार श्रीमंत पाटील यांचा दावा; पक्षात प्रवेश करण्यासाठी दिली होती पैशांची ऑफर..

 आमदार श्रीमंत पाटील यांचा दावा; पक्षात प्रवेश करण्यासाठी दिली होती पैशांची ऑफर..

कर्नाटक, 13 सप्टेंबर: आमदार श्रीमंत पाटील यांनी  खळबळजनक दावा केला आहे. कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाच्या तोंडावर भाजपचे माजी मंत्री आणि कागवडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता चांगलीच खळबळ माजली आहे. काँग्रेस  सोडण्यासाठी भाजपने  पैशांची ऑफर दिली होती, असं श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैशांची ऑफर दिली होती. मात्र मी भाजपची पैशांची ऑफर न घेता पक्षात आलोय.

मला पैसे नको आहेत. तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नाही, असंही पाटील म्हणालेत.


यावर भाजपनं किती पैशांची ऑफर दिली होती?

असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला.त्यावर ते म्हणाले की, आपल्याला पैसे नको तर चांगले पद हवे, असं मी भाजपला सांगितलं. तुम्हाला किती पैसे हवेत, असं भाजपनं विचारलं होतं असंही ते म्हणालेत. पण आपल्याला पैसे नकोत तर जनतेची सेवा करण्यासाठी सरकारमध्ये चांगलं पद द्या असं पक्षाला सांगितलं होतं, असा दावा पाटील यांनी केला.

श्रीमंत पाटील हे कर्नाटकातील कागवाड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. कागवड तालुक्यातील ऐनापूर गावात विकासकामांचं उद्घाटन करताना ते बोलत होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.