कोयना धरणातून 25 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी -जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज, नागरिकांनी घाबरु नये, अफवांवर विश्वासू ठेवू नये
सध्यस्थितीतीत धरणातील पाणीसाठा व विसर्गाचा माहिती पुढीलप्रमाणे- कोयना धरण आजचा पाणीसाठा 103.84 धरण भरलेली टक्केवारी 99.00, विसर्ग (क्युसेस)25000, धोम धरण आजचा पाणीसाठा 12.14 धरण भरलेली टक्केवारी 90.00, विसर्ग (क्युसेस)622, कन्हेर धरण आजचा पाणीसाठा 9.49 धरण भरलेली टक्केवारी 94.00, विसर्ग (क्युसेस)24, उरमोडी धरण आजचा पाणीसाठा 8.62 धरण भरलेली टक्केवारी 86.00, विसर्ग (क्युसेस)350, तारळी धरण आजचा पाणीसाठा 5.59 धरण भरलेली टक्केवारी 96.00, विसर्ग (क्युसेस)270 धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरु राहील्यास धरणामधील आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
तरी नदी काठच्या विशेषत: वाळावा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगपालिका क्षेत्रातील नदी काठावरील व सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी व नदी पात्रात कोणीही जाऊ नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकची सतर्क बाळगण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
