करदात्यांसाठी मोठी बातमी; इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली
नवी दिल्ली : देशातील करव्यवस्था सुधारण्यावर केंद्र सरकार भर देत आहे. वस्तू व सेवा कर कायद्याच्या माध्यमातून करदात्यांना एकाच छत्राखाली आणण्यात केंद्र सरकार यशस्वी झालं आहे. इन्फोसिस कंपनीने करभरणा करण्यासाठी नवीन पोर्टलची निर्मीती केली आहे. पण हे पोर्टल योग्य चालत नसल्याने सरकारवर तारीख वाढवण्याची नामुष्की येत आहे.
आयकर भरताना सरकार नियम लावत असतं. सरकारने ठरवून दिलेल्या तारखेतच कर भरणा करावा लागतो. इन्फोसिसने तयार केलेल्या पोर्टलच्या निष्क्रीयतेमुळे सरकार आयकर रिटर्न्सची तारीख सतत वाढवत आहे. आयकर भरणाऱ्यांना आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
भारतीय आयकर विभागाने याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे. आयकर रिटर्न आणि आयकर अधिनियम, 1961 अंतर्गत मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी ऑडिट रिपोर्ट दाखल करताना करदात्यांनी नोंदवलेल्या अडचणी लक्षात घेऊन, सीबीडीटीने आयटीआर दाखल करण्याची तारीख आणि ऑडिट रिपोर्टच्या तारखा मूल्यांकन वर्ष 21-22 साठी वाढविण्यात आल्या आहेत, असं आयकर विभागाने म्हटलं आहे.
आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक असणार आहे. केंद्र सरकार आणि इन्फोसिस यांनी पोर्टल निर्मीती केली आहे. आयकर भरताना मुल्यांकन वर्ष, आयकर भरणा याबाबी लक्षात ठेवाव्या लागतील, असंही आयकर विभागाने म्हंटल आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
