राहुल गांधींनी तब्बल १४ किमी पायपीठ करत पोहोचले वैष्णोदेवीच्या दर्शनाला..
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी जम्मू काश्मीर दौऱ्यासाठी पोहचले. या वेळी त्यांनी तब्बल १४ तास पायी चालत वैष्णोदेवी मंदिरात पोहचले. या संदर्भातील व्हिडियो काँग्रेसने व्हिडीओ शेअर केला असून यावेळी राहुल गांधी वैष्णोदेवीच्या दिशेने चालताना दिसत आहेत.
https://twitter.com/INCIndia/status/1436200261052211200?s=20
पत्रकारानी याबाबत विचारले असता राहुल गांधी यांनी आपण कोणतंही राजकीय भाष्य करणार नसल्याचं सांगितलं. ते पडूनच म्हणाले,'मी येथे देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि प्रार्थनेसाठी आलो आहे. मला कोणतंही राजकीय भाष्य करायचं नाहीये.' दरम्यान, जम्मू काश्मीरनंतर राहुल गांधी लडाखचा दौरा करणार आहेत. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतर राहुल गांधींचा हा दुसरा दौरा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
