बाप्पाच्या आगमनादिवशी स्वस्त झालं सोनं, 500 रुपयांनी उतरले भाव...
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर: आज गणेश चतुर्थीदिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. तर चांदीचे दर देखील आज कमी झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुस्ती पाहायला मिळाल्याने शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. एमसीएक्सवर सोन्याची वायदे किंमत कमी 0.14 टक्क्यांनी कमी होऊन 46,973 प्रति तोळावर पोहोचली आहे. याशिवाय चांदीच्या दरात आज किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे. आठवडाभरात 500 रुपयांनी स्वस्त मिळत आहे सोनं आज गणेश चतुर्थीदिवशी सोन्याचे दर 500 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
गेल्या सोमवारी प्रति तोळा सोन्याचे दर 47,451 रुपये होते. तर आज सोन्याचे दर 46,973 रुपये प्रति तोळा झाले आहेत. या हिशोबाने सोन्याचे दर 500 रुपयांनी उतरले आहेत. चांदीचे आजचे दर चांदीच्या दरात आज किरकोळ तेजी पाहायला मिळाली आहे.
चांदीचे दर आज 0.05 टक्क्यांनी उतरले आहेत. या घसरणीनंतर सोन्याचे दर 64,150 रुपये प्रति किलो झाले आहेत. सोमवारी चांदीचे दर 65,261 रुपये किलो होते.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता.
22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अॅप' च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
