Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका क्षेत्रात होणाऱ्या महालसीकरणात मुस्लिम समुदाय सहभागी होणार : आयुक्त कापडणीस आणि मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीत निर्णय: 100 टक्के लसिकरणाचे आयुक्तांचे आवाहन

महापालिका क्षेत्रात होणाऱ्या महालसीकरणात मुस्लिम समुदाय सहभागी होणार : आयुक्त कापडणीस आणि मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीत निर्णय: 100 टक्के लसिकरणाचे आयुक्तांचे आवाहन


सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात आजअखेर 74 टक्के लसीकरण झाले असून दिनांक 21 आणि 22 आक्टोबर रोजी होणाऱ्या महालसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी शामरावनगर आरोग्य केंद्रात आयोजित मुस्लिम धर्म गुरूंच्या बैठकीत केले आहे. यावेळी मुस्लिम धर्मगुरूंनीसुद्धा सर्व समाज बांधवांना लस घेणेचे आवाहन केले आहे. यावेळी नगरसेवक फिरोज पठाण यांनी कोव्हीशिल्ड लस घेत सर्व समाज बांधवांनी लसीकरण करून घेणेचे आवाहनही केले.

    कोव्हिडं लसीकरण महालसीकरण अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाचा अधिक सहभाग व्हावा आणि जास्तीजास्त लसीकरण व्हावे या उद्देशाने शामराव नगर आरोग्य वर्धिनी केंद्रात मुस्लिम समाजाच्या जबाबदार लोकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मनपा आयुक्त नितीन कापडणीस, जमियते ए उलेमा हिंदचे अध्यक्ष हाफिज सद्दाम, डॉ. वसीम मुजावर, हज कमिटी अध्यक्ष हाजी आत्तार, नगरसेवक फिरोज पठाण, डॉ सुनील आंबोळे, डॉ वैभव पाटील, डॉ शबाना लांडगे


आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त कापडणीस यांनी कोव्हिडं लसीकरण केल्यावर दुष्परिणाम होत असल्याच्या सर्वांच्या शंकांचे निरसन करीत आकडेवारी आणि स्थायी पुरावे यांच्या आधारे सर्वांच्या शंकांचे समाधान केले. यामध्ये कोव्हिडं लसीकरण किती गरजेचे आणि आवश्यक आहे. याचे फायदे सुद्धा आयुक्त कापडणीस यांनी सर्वाना समजावून सांगितले. याचबरोबर महापालिका क्षेत्रात 74 टक्के लोकांनी आपले लसीकरण करून घेतले असून उर्वरित 26 टक्के लोकांचे लसीकरण करून महापालिका क्षेत्रात 100 टक्के लसीकरण करण्याचा मानस यावेळी व्यक्त केला. यासाठी 21 आणि 22 आक्टोबर रोजी मनपाक्षेत्रात महालसीकरण आयोजित केले असून यामध्ये मुस्लिम समाजातील नागरिकांनी सहभागी होऊन कोव्हिडं पासून कायमचा बचाव करण्यासाठी आपले लसीकरण करून घ्यावे अशी जागृती करण्याचे आवाहन सर्व मुस्लिम धर्मगुरूंना केले आहे. यावेळी आयुक्त कापडणीस यांनी केलेल्या शंका निरसनानंतर मुस्लिम धर्मगुरूंनी समाज बांधवांनी आणि विशेष करून महिला वर्गानी गैरसमज बाजूला ठेऊन जास्तीजास्त लसीकरण करून घेणेची ग्वाही दिली. या बैठकीस सांगली शहर आणि प्रभाग 15 आणि 16 मधील मुस्लिम समाजाच्या धर्म गुरूंनी सहभाग घेतला होता.

नगरसेवक फिरोज पठाण यांनी घेतली लस


या बैठकीनंतर शंकांचे समाधान झाल्याने नगरसेवक फिरोज पठाण यांनी आयुक्त कापडणीस आणि सर्व मुस्लिम धर्मगुरू यांच्या उपस्थितीत कोव्हीशिल्ड लस घेत स्वता लसीकरण करून घेत सर्वानी लस घ्यावी, याचा कोणताही त्रास किंवा दुष्परिणाम होत नाही त्यामुळे सर्वानी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.