भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा लाभ घ्या - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. २०, : महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब असाधारण क्रं. 87 महसूल व वन विभागाकडील दि. 8 मार्च 2019 रोजी अधिसूचना प्रसिध्द झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र जमिन महसूल (भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम, 2019 निर्गमित केलेला आहे. हे नियम कृषिक किंवा निवासी किंवा वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग-2 अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या किंवा प्रदानानंतर सक्षम प्राधिकाऱ्याकडून असा वापर अनुज्ञेय करण्यात आलेल्या जमिनींना लागू केलेला आहे. शासनाच्या या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
या अधिसुचनेनुसार ज्यांना यापूर्वी कब्जेहक्काने जमिनी मिळालेल्या आहेत, तसेच ज्या सहकारी गृह निर्माण संस्थाना भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या व आजही सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भोगवट्यात असलेल्या जमिनी व सहकारी गृह निर्माण संस्थांना कब्जेहक्काने प्रदान केलेल्या व आजही सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भोगवट्यात असलेले जमिनीधारक हे या अधिसुचनेनुसार भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करून घेण्यासाठी इच्छुक आहेत ते याचा लाभ घेवू शकतात. ज्यांना अशा जमीनीचे / प्लॉटचे भोगवटादार वर्ग-2 चे भोगवटादार वर्ग-1 करून घ्यावयाचे आहे त्यांनी तालुक्यातील तहसिलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांच्याकडे चौकशी करून अर्ज सादर करू शकतील.
या राजपत्रानुसार अकृषिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग २ किंवा भाडेपट्ट्याने प्रदान जमिनी, निवासी, वाणिज्यीक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग 2 किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या किंवा प्रदानानंतर असा पान अनुज्ञेय असलेल्या जमिनीचे भेगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करताना वार्षिक दर विवरण पत्रातील शेतीच्या दराने / संभाव्य बिनशेतीच्या दराने रूपांतरण अधिमूल्य भरून भोगवटादार-1 मध्ये रूपांतरण केले जात आहे. शासन राजपत्रानुसार राजपत्र प्रसिध्द झालेल्या म्हणजेच 8 मार्च 2019 पासून पुढील 3 वर्षे म्हणजे 7 मार्च 20222 पर्यंत खालील नमूद केल्याप्रमाणे वाढ होणार आहे.
वाटप जमिनी निहाय 8 मार्च 2019 पासून रूपांतरित अधिमूल्य भरावयाच्या रकमेचा तपशिल (वार्षिक दर विवरण पत्राप्रमाणे) व कंसात 7 मार्च 2022 नंतर रूपांतरीत अधिमूल्य भरावयाच्या रकमेचा तपशिल (वार्षिक दर विवरण पत्राप्रमाणे) पुढीलप्रमाणे आहे. नगरपंचायत / नगरपरिषद /म.न.पा./विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीबाहेरील कृषि प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या (अ) ज्या जमिनी प्रादेशिक विकास आराखड्यात शेती / ना विकास वापर विभागात स्थित आहेत (ब) ज्या जमिनी प्रादेशिक विकास आराखड्यात अकृषिक वापर विभागात स्थित आहेत. कृषि प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या व सद्यस्थितीमध्ये नगरपंचायत / नगरपरिषद / महानगरपालिका / विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये स्थित असेलेल्या जमिनी ज्यांचा विकास आराखड्याप्रमाणे बिनशेती वापर अनुज्ञेय आहे किंवा बिनशेती वापर अनुज्ञेय नाही - 50 टक्के (75 टक्के). वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी कब्जेहक्काने किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी - 50 टक्के (60 टक्के). रहिवास प्रयोजनासाठी कब्जेहक्काने धारण केलेल्या जमिनी - 15 टक्के (60 टक्के). रहिवास प्रयोजनासाठी भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी - 25 टक्के (75 टक्के). सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने दिलेल्या व आजही सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भोगवट्यात असलेल्या जमिनी - 15 टक्के (75 टक्के). सहकारी गृह निर्माण संस्थांना कब्जेहक्काने दिलेल्या व आजही सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भोगवट्यात असलेल्या जमिनी - 15 टक्के (60 टक्के).
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.