जर्मनीच्या या कंपनीत रिलायन्सची 218 कोटींची गुंतवणूक, भारतीय बाजारासाठी बनवणार सिलिकॉन वेफर्स
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: रिलायन्स इंडस्ट्रीजने जर्मनीची सेमीकंडक्टर चिप निर्माता नेक्सवेफ मध्ये गुंतवणूक केली आहे. भारतीय बाजारपेठेसाठी हा एक धोरणात्मक करार आहे. नेक्सवेफ ही एक कंपनी आहे जी उच्च कार्यक्षमता मोनोक्रिस्टलाइन सिलिकॉन वेफर्स तयार करते. हे सिलिकॉन वेफर्स सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी खूप महत्वाचे आहेत. 2.5 कोटी युरोची गुंतवणूक रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण मालकीची कंपनी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (RNESL) ने जर्मनीच्या नेक्सवेफमध्ये नवीन शेअर्स खरेदीसाठी 2.5 कोटी युरो (सुमारे 218 कोटी रुपये) गुंतवले आहेत. एक्सचेंज फायलिंगमध्ये RIL कडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या कराराअंतर्गत, RNESL 287.73 युरो प्रति शेअर दराने नेक्सवेफच्या 86,887 सीरिज सी शेअर्सचे अधिग्रहण करेल. या व्यतिरिक्त, RNESL ला 36,201 वॉरंट देखील जारी केले जातील, जे निर्धारित अटींनुसार 1 युरो मध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात. Reliance समूहाचा आणखी एक मोठा करार, डेनमार्कच्या Stiesdal सह पार्टनरशिप ही गुंतवणूक भारतीय बाजारपेठेसाठी करण्यात आलेला धोरणात्मक करार आहे. Nexsafe मध्ये रिलायन्सची गुंतवणूक उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासाला गती देईल.
भारतात मोठ्या प्रमाणात होणार वेफरचे उत्पादन नेक्सवेफ हाय एफिशियन्सी मोनोक्रिस्टलाइन सिलिकॉन वेफर्स तयार करते. सिलिकॉन वेफर अर्धसंवाहक बनवण्यासाठी वापरली जाणारी सामग्री आहे. आजकाल सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सेमीकंडक्टर वापरले जातात. रिलायन्स या भागीदारीद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात मोठ्या प्रमाणावर वेफर्स तयार करण्याची योजना आखत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, 'नेक्सवेफसोबत आमची भागीदारी महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात आहे. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी हरित ऊर्जेच्या गरजा पूर्ण करणे हे ध्येय आहे. NexWafe मधील आमची गुंतवणूक भारताला ग्रीन एनर्जी आणि फोटोव्होल्टिकच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जागतिक क्षमता स्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्हाला विश्वास आहे की सौर उत्पादकांना नेक्सवेफच्या अल्ट्रा-थिन वेफर फोटोव्होल्टिक तंत्रज्ञानाचा फायदा होईल, जे भारतातील ग्राहकांना मदत करेल.
हे भारताला हवामान संकटावर मात करण्यास मदत करेल.' Reliance New Energy Solarकडून 5792 कोटी रुपयांत आरईसी सोलर होल्डिंग्जचे अधिग्रहण RIL चा आणखी एक महत्त्वाचा करार RIL ने 12 ऑक्टोबर रोजी घोषणा केली की त्यांचे सोलर युनिट रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने Stiesdal A/S सह भागीदारी केली आहे. दोन्ही कंपन्या मिळून हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर बनवतील. रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (आरएनईएसएल) ने मंगळवारी एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये याबाबत माहिती दिली. Stiesdal A/S ही डेनमार्कची कंपनी आहे.
ही कंपनी क्लायमेट चेंज मिटिगेशनशी संबंधित कमर्शलाइझ तंत्रज्ञान तयार करते. Stiesdal ची स्थापना हेनरिक स्टीएसडल द्वारे करण्यात आली आहे. पवन ऊर्जेच्या क्षेत्रात ही जगातील आघाडीची कंपनी आहे. तसेच, जागतिक नवीकरणीय उद्योगात एक वेगळा विचार करणारी ही कंपनी आहे. (डिस्क्लेमर- नेटवर्क 18 आणि टीव्ही 18 कंपन्या चॅनेल/वेबसाइटचे संचालन करतात, ज्याचे नियंत्रण स्वतंत्र मीडिया ट्रस्टद्वारे केले जाते, ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.