पवारांना आता कुणीच वाचवू शकत नाही, किरीट सोमय्या यांचा इशारा
मुंबई: भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी मंत्री खासदार किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून महा विकास आघाडीच्या मंत्र्यांवर आरोप करून घोटाळे उघड करत आहे. जणू काही त्यांनी घोटाळ्यांची मालिकाच सुरू केली आहे. आतादेखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार असा दावाच आता किरीट सोमय्या यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणालेत आता अजित पवारांना कुणीच वाचवू शकत नाही.किरीट सोमय्या म्हणाले, 'अजित पवारांची एवढी समृद्धी आहे की किरीट सोमय्यांनी पाहायला यावं असे मेसेज फिरतात, तर त्यांच्या कारस्थानाचा एक नमुना आज मी जनतेसमोर आणणार आहे. तर या महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी दीड वर्षात अनेक घोटाळे केले, मंत्रालयासमोर बॅनर लावले, माझ्या कुटुंबियांवर आरोप केले, तर उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यात हिम्मत असेल तर माझे घोटाळे बाहेर काढा, चौकशी करा, शिक्षा करा. तुमचे दोन डझन नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले. असं वक्तव्य खासदार किरीट सोमय्या यांनी केल आहे.
अखेर तो मां का बुलाया आया हैं
अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईकांसाठीही उद्धव ठाकरे कोर्टात गेले, काय झालं? भावना गवळींच्या ट्रस्टमध्ये 22 कोटींचा घोटाळा झाला आहे. ठाकरे साहेबांना दिसत नाही. नेते घोटाळा करतात शरद पवार, उद्धव ठाकरेंना दिसत नाही? भावना गवळींनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे. घरात 25 कोटी कॅश ठेवली, 'अखेर तो मां का बुलाया आया हैं, आर्थर रोड जेल जानाही पडेगा..', असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला.
त्यामुळे मान्य करा की तुम्ही घोटाळे करत आहात
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये हिम्मत असली पाहिजे. शरद पवारांच्या रिमोटव्दारे घोटाळे होत आहेत, त्याचं उत्तर द्यावं. त्यांच्या स्टेटमेंटची किंमत नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले.माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सेशन कोर्टापासून कुठल्याच कोर्टाने हात धरला नाही, त्यामुळे मान्य करा की तुम्ही घोटाळे करत आहात, असा हल्लाबोल सोमय्यांनी केला.
बहिणींच्या घरावरही छापा टाकला
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल छापा टाकला होता. विशेष म्हणजे कालपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली, त्याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला.
नेमकं काय आहे प्रकरण?
अजित पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने 7 ऑक्टोबरला धाडी टाकल्या. अजित पवारांसह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवरही आयकरने छापेमारी केली. आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.