पाणी गळती बंद करण्यासाठी दि. १६ ते १९ ऑक्टोबरअखेर सांगलीत पाणीपुरवठा बंद राहणार: नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवावा: पाणीपुरवठा विभागाचे आवाहन
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे. सांगली येथील माळबंगला जलशुद्धीकरण केंद्र येथील वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याची गळती सुरु आहे. त्यामुळे सांगली व कुपवाड शहरात पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. यानुसार, सदर वितरण व्यवस्थेतील पाणी गळती बंद करण्यासाठी दि. १६ ते १९ ऑक्टोबर, २०२१ या चार दिवसात या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सदर दुरुस्ती कालावधीमध्ये वॉर्ड क्र. १, ९, १०, ११, १२, १७ व १९ मधील खालील नमूद भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहील. तसेच नमूद वॉर्डातील पाणी पुरवठा बंद राहणारे भाग पंचशिलनगर, रेल्वे फाटक परिसर, शिंदे मळा, रेपे प्लॉट, वाल्मिकी परिसर, जुना बुधगांव रस्ता - जय अंबे ढाब्यापर्यंत, शिवोदयनगर, अजिंक्यनगर, गोसावी गल्ली, लक्ष्मीनगर, शिवाजी हौसिंग सोसायटी, विकासनगर.
घन:शामनगर, कलानगर, आप्पासो पाटीलनगर, इंद्रप्रस्थनगर, व्यंकटेशनगर, अंबाईनगर, रतनशीनगर. औद्यगिक वसाहत, चिंतामणनगर झोपडपट्टी, चिंतामणीनगर, राजनगर, जासूद मळा, मिरा हौ. सोसा., टिंबर एरिया उत्तर बाजू, लाले प्लॉट, चिंतामणी सोसा., रामरहिम कॉलनी, साईनगर, अभिनंदन व हडको कॉलनी, पाटणे प्लॉट, अहिल्यानगर सोसा., इंदिरा कॉलनी, चैतन्यनगर, दगडे प्लॉट, भाग्योदय सोसा., अयोध्यानगर, राजमाने सोसा., संजयनगर पत्राचाळ, संजय मजूर सोसा., रुक्मिणी सोसा., स्टेट बँक कॉलनी, आनंदपार्क, उर्मिलानगर, शिंदे मळा, शेळके पार्क, विद्या सोसा., आरवाडे पार्क, मयूर सोसायटी, वृंदावन सोसा , नेहरुनगर, सुंदरपार्क, सह्याद्रीनगर, खोजा कॉलनी, नमराह मोहल्ला, क्लासिक पार्क, महात्मा गांधी कॉलनी, आनंदवन सोसा., टी.के.पाटील सोसा., समृद्धीनगर, लक्ष्मी देऊळ हडको, अभयनगर, गितासाई नगर, माळी वस्ती, उत्कर्ष हडको, आदगोंडा पाटील प्लॉट, निरंकारी कॉलनी, सोनार मळा, संगमनगर, सुभाषनगर, यशवंतनगर, वसंतनगर, बालाजीनगर, बाळकृष्णनगर, इंदिरानगर, अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, वांगीकर प्लॉट, माकडवाले गल्ली १०० फुटी रस्ता परिसर, बाल हनुमान घरकुल योजना., एकता कॉलनी, मार्केट यार्ड, राजमाता हौ. सोसा., सदानंद हॉटेल परिसर, वसंत कॉलनी, सरस्वतीनगर, जयहिंद कॉलनी, चैत्रबन कॉलनी, कृष्णाली वसाहत, विजयनगर पश्चिम.
चांदणी चौक, सिव्हील हॉस्पिटल पूर्व बाजू, जवाहर सोसा., सावंत प्लॉट, गुलमोहर कॉलनी,
इंदिरानगर झोपडपट्टी, मंगलमुर्ती कॉलनी, जिल्हा मध्यवर्ती बँक मागील परिसर, विश्रामबाग पुजारी प्लॉट, आदित्य हौ. सोसा. परिसर. तरी, येथील नागरिकांनी ही दुरुस्ती सुरु होण्यापूर्वी पिण्याचे पाणी / वापरण्याचे पाणी याचा योग्य साठा करुन ठेवावा. खाजगी टँकर किंवा महानगरपालिकेचे टँकर यामार्फत पाणी उपलब्ध करुन घ्यावे, असे आवाहन पाणी पुरवठा अभियंता परमेश्वर अलकुडे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.