सांगली :- मृत्यूशी झुंज देत होता पण डॉ. बाबासाहेबांचे गाणं ऐकण्याची इच्छा व्यक्त करत होता : बाबासाहेबांचे गाणं ऐकल्यानंतर प्रसाद एरंडोलीकर यांनी प्राण सोडले.
सांगली :- क्षणार्धातच माझा अंत जवळ आलाय, मला माझ्या बाबासाहेबाच्या भीम गीते एकुद्या. हे अखेरचे शब्द आहेत. सांगलीतील चित्रकार, उत्कृष्ठ रांगोळीकार,दलित पँथरचे कार्यकर्ते प्रसाद सहदेव एरंडोलीकर यांचे. प्रसाद सहदेव एरंडोलीकर यांचं अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. डॉक्टर यांनी घरी घेऊन जावा असा सल्ला दिला होता. त्यांचे कुटुंबीय रडत होते. पत्नी मुलं भाऊ भाऊ भावाची मुलं, सुना नातवंडे त्यांच्यासोबत घरात बसले होते. त्यांची काळजी घेत होते. मात्र एरंडोली कर म्हणत होते बाबासाहेबांची गाणी मला ऐकायचे आहेत.
कुटुंबीय रडत होते मात्र बाबासाहेबांची गाणी म्हणत होते.
गाणी ऐकत ऐकत प्रसाद एरंडोली कर यांनी प्राण सोडले. सच्चा भीमसैनिक बाबासाहेबांची गाणी ऐकत ऐकत कालकथित झाला.
सिद्धार्थ परिसर येथील व सिद्धार्थ व्यायाम मंडळाचे खेळाडू, सभासद व माजी कोशाध्यक्ष तसेच चित्रकार, उत्कृष्ठ रांगोळीकार,दलित पँथरचे कार्यकर्ते प्रसाद सहदेव एरंडोलीकर वय वर्ष 59 यांचे दि. १२-१०-२०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी पत्नी परिवार आहे. प्रसाद एरंडोली कर यांच्या निधनाने सिद्धार्थ परिसर नाहीतर संपूर्ण सांगली परिसरावर शोककळा पसरली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.