जागतिक दृष्टी दिनानिमित्त आयोजित उपक्रमाचा लाभ घ्या - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे
सांगली, दि. 13, : प्रतिवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरूवारी जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो. यावर्षी दि. १४ ऑक्टोबर रोजी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे नेत्र विभागात जागतिक दृष्टी दिन साजरा केला जाणार आहे. नेत्र विभागात मोतिबिंदू, खुपऱ्या, डायबेटीक रेटीनोपॅथी, लहान मुलांमधील नेत्रविकारांचा प्रतिबंध व व्यवस्थापन करणे याबाबतची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.
चालूवर्षी २२ व्या जागतिक दृष्टी दिनाचे घोषवाक्य Love Your Eyes असे आहे. सांगली जिल्ह्यातील विविध उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विविध नेत्ररोग आजारांची तपासणी नेत्र चिकित्सा अधिकारी करणार आहेत. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील नेत्र तपासणी झालेल्या रूग्णांना पुढील उपचारासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे संदर्भित करावे. त्याचबरोबर नेत्र आजार असलेल्या जास्तीत जास्त लहान मुलांचा शोध घेवून संदर्भित संस्थामध्ये समन्वय निर्माण करून लहान मुलांचे नेत्रविकार आजाराचे उपचार करण्यात यावेत. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.