Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उदयनराजेंच्या ताफ्यात नवी कार; हटके नंबर..

 उदयनराजेंच्या ताफ्यात नवी कार; हटके नंबर..


सातारा : भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले या नावाची नेहमीच चर्चा असते. उदयनराजेंच्या स्टाईलची चर्चा होते, त्यांच्या विधानांची चर्चा होते, त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची चर्चा होते. तसेच, त्यांच्या कार कलेक्शनचीही नेहमीच चर्चा होत असते. उदयनराजेंच्या ताफ्यात आता आणखी एका कारची भर पडली आहे. उदयनराजेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नव्या कारसह फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, बीएमडब्लू कंपनीची ही कार दिसते.

उदयनराजेंचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, ते कधी तुम्हाला गाडी चालवताना दिसतील, कधी कार्यकर्त्यांसोबत गाडीत प्रवास करताना दिसतील. तर, कधी गाणे लावून सुरेल संगीताचा आनंद घेताना दिसून येतील. आता, त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, दसऱ्याच्या शुभ महुर्तावर त्यांनी नवी बीएमडब्लू कार खरेदी केल्याचे दिसून येते.


उदयनराजेंच्या कलेक्शनमधील सर्व गाड्यांना ००७ हा नंबर असून त्यांच्या अनेक समर्थकांच्या गाड्यांचाही हाच क्रमांक आहे. उदयनराजेंनी नवीन खरेदी केलेल्या बीएमडब्लू कारला एमएच ११ डी डी ००७ हाच नंबर घेतला आहे. पुण्यातून गाडी खरेदी करतानाचा त्यांचा शोरुममधील फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्याला अनेकांनी दाद दिली यावरुन सोशल मीडियात उदयनराजेंची असलेली क्रेझ पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.

उदयनराजेंच्या ताफ्यामध्ये ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, मारुती जिप्सी या चार आलिशान कार आहेत. तर त्यांच्या पत्नी दमयंतीराजेंकडे पोलो ही कार आहे. आता, त्यांच्या या ताफ्यात गाड्यांच्या दिमतीला आणखी एक कार दाखल झाली आहे. बीएमडब्लू कंपनीची टेक्स फाईव्ह हे कारचं मॉडेल असून या कारची किंमत 1 कोटी रुपये आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.