Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा बँक निवडणुकीत शेतकर्‍यांची चर्चा कधी होणार? 300 सोसायट्यांनी कर्जे थांबवली शेतकर्‍यांच्या पेक्षा बड्यांची थकबाकी मोठी

जिल्हा बँक निवडणुकीत शेतकर्‍यांची चर्चा कधी होणार? 300 सोसायट्यांनी कर्जे थांबवली शेतकर्‍यांच्या पेक्षा बड्यांची थकबाकी मोठी


सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लवकरच जाहीर होणार असून ही निवडणूक बिनविरोध करण्याकडे सत्ताधारी राजकीय पक्षांचा कल असून प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या प्रश्नांची चर्चा करण्याऐवजी आपल्याला किती वाटून घेता येईल याची चर्चा सुरू आहे. याचा विचार सभासद शेतकर्‍यांनी करून संबंधितांना जाब विचारला पाहिजे, असे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीचे नेते सतीश साखळकर यांनी केले आहे. चर्चाच करायची असेल तर पुरामुळे व कोरोनामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पुन्हा कसे उभा करता येईल याची करता येईल. ज्याप्रमाणे हजारो कोटी रुपये देऊन अथवा पुन्हा कर्ज देऊन स्वत:चे कारखाने वाचवता त्याप्रमाणे शेतकर्‍यांना वाचवण्याबाबत चर्चा करावी, यासाठी शेतकर्‍यांनी आग्रह धरावा, अशी मागणी साखलकर यांनी केली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्तीची स्थापना शेतकर्‍यांच्या हितासाठी झाली. मात्र अलीकडील काळात स्वत:च्या संस्थांना कर्जे मंजूर करून घ्यायची व ती नंतर बुडवून स्वत:च्या खासगी कंपनीमार्फत संस्था विकत घ्यायची, असा उद्योग सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 40 टक्के व 60 टक्केपेक्षा कमी वसूल झालेल्या सोसायट्यांना कर्जे दिली जात नाहीत. यामुळे शेतकर्‍यांना कर्जापासून वंचित रहावे लागत आहेत. सुमारे 300 हून अधिक सोसायट्या तोट्यात असून त्यातून शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा अपुर्‍या प्रमाणात किंवा होत नाही असे चित्र आहे.

वास्तविक शेतकर्‍यांनी कर्जे प्रामाणिक पणे भरली आहेत. काही शेतकर्‍यांनी दुर्देवाने आत्महत्या केल्या. पण बड्या धेंड्यांची कर्जे ही शेतकर्‍यांच्या थकीत कर्जापेक्षा जास्त आहेत. यातील काही कारखाने त्यांच्या थकबाकीपेक्षा निम्या किमतीला जिल्हा बँकेनेच विकत घेतली आहेत. मग ही पद्धत शेतकर्‍यांना का लागू नाही अनेकांना मुदतवाढ अथवा पुन्हा कर्ज देण्याचा प्रकार चालतो मग शेतकर्‍यांना देखील हाच न्याय हवा होता. यासर्व प्रश्नांची चर्चा आता सत्ताधारी पक्षांनी करावी. शेतकर्‍यांनी याचा जबा विचारावा असे आवाहन सतीश साखळकर यांनी केले आहे.

ज्यांनी बँक बुडविली,ज्यांचा एनपीए हजार कोटी आहे तेच परत संचालक होणार असतील कसे होणार,डिपॉझिट शेतकऱ्यांचे व चैनी यांची.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.