सांगली कारागृहामध्ये महापालिकेकडून क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम संपन्न
सांगली: राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये क्षयरोग व HIV जनजागृती प्रबोधन कार्यक्रम राबविण्यात आला. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सांगली पोलीस मुख्यालयातील पोलीस उपाअधीक्षक आप्पासाहेब मांजरे , जिल्हा कारागृह अधीक्षक अनिल खामकर तसेच सांगली मिरज-कुपवाड मनपा आरोग्य अधिकारी तथा शहर शयरोग अधिकारी मा. डॉ. रवींद्र ताटे , वरिष्ठ डीपीएस नितीन देसाई , पीपीएम कॉर्डिनेटर सपना देशपांडे, सीनियर ट्रिटमेंट सुपरवायझर अनिल चव्हाण, टी.बी.एच.व्ही. साधना फडणीस व एलटीबीआय कॉर्डिनेटर अनिल पुजारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये डॉ. रवींद्र ताटे यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच श्री नितीन देसाई यांनी क्षयरोग व HIV बद्दल माहिती देऊन औषधोपचार व्यवस्थित घेणे बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल पुजारी यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.