Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदी दरात वाढ.

 आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदी दरात वाढ.


नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : आज सोमवारी 18 ऑक्टोबर रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर डिसेंबर सोन्याचा भाव 0.11 टक्क्यांनी वाढून 47,265 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तसंच चांदीचा दरही वाढला आहे. चांदी दरात 0.16 टक्क्यांची वाढ होऊन 63,371 रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात वाढ झाल्याने सोमवारी सोन्याचे दर वाढले आहेत. देशातील वाढत्या मागणीमुळे एप्रिल ते सप्टेंबर 2021 दरम्यान सोन्याची आयात 24 अब्ज डॉलर्स झाली. मागील वर्षी याच काळात पिवळ्या धातूची आयात 6.8 अब्ज डॉलर होती. तर दुसरीकडे चालू आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर दरम्यान चांदीची आयात 15.5 टक्क्यांनी कमी होऊन 619.3 दशलक्ष झाली आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाअखेरीस सोनं रेकॉर्ड स्तरावर पोहोचू शकतं असा अंदाज आहे.

त्याशिवाय देशात सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने सोन्याची मागणी वाढेल. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर - सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात.

8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल. अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता - सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.