महिला अधिकाऱ्यावर मधमाशांचा हल्ला; पहाटे ट्रेकिंगला गेल्यानंतर घडली घटना
मुंबई, : 1992 बॅचच्या सनदी अधिकारी असलेल्या मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्यावर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे गिर्यारोहकासोबत ट्रेकिंगसाठी गेलं असता, अचानक त्यांच्यावर आणि त्यांच्या काही साथीदारांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत असणारे गिर्यारोहक मिलिंद यांना अनेक मधमाशांनी दंश केला आहे. पण सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून औषधोपचार घेतला आहे. याबाबतचा थरारक अनुभव महिला IAS ऑफिसर मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी स्वत: फेसबुक पोस्टद्वारे सांगितला आहे.
मनीषा पाटणकर-म्हैसकर या 1992 बॅचच्या सनदी अधिकारी असून त्या सध्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. पाटणकर-म्हैसकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून मधमाशांनी केलेल्या हल्लाबाबतचा थराराक अनुभव सांगितला आहे. महिला अधिकारी पाटणकर-म्हैसकर या काल आपल्या काही साथीदारांसोबत ट्रेकींगसाठी गेल्या होत्या. यावेळी गिर्यारोहक मिलिंद हा सर्वात पुढे चालत होते, तर पाटणकर-म्हैसकर या मिलिंद यांच्या मागे काही अंतरावर चालत होत्या.
जुळ्या भावांसाठी रविवारची रात्र ठरली काळरात्र; 25 व्या मजल्यावरून पडून झाला अंत दरम्यान, अचानक मिलिंद मागे वळाले आणि त्यांनी ओरडत मनीषा यांना पळण्यास सांगितलं. मिलिंदवर मधमाशांनी जोरदार हल्ला केला होता. यावेळी मनीषा यांनी आपल्याकडील स्टोल मिलिंदच्या दिशेने फेकला. मिलिद स्टोल पांघरून खाली बसला.
पण शेकडो माशा त्याच्याभोवती घोंघावत होत्या. तर काही माशा अजूनही मिलिंदला दंश करत होत्या. तर काही माशा मनीषा यांच्या दिशेने दंश करण्यासाठी आल्या. दरम्यान तेथील काही स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्यांच्याजवळील कोट आणि शॉल मनीषा यांना दिली.
यामुळे त्या मधमाशांच्या तावडीतून थोडक्यात बचावल्या आहेत. लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण;ब्रिगेडीयरचं कनेक्शन समोर यानंतर येथील काही स्थानिक नागरिकांनी धूर करून मधमाशांना पळवून लावलं. पण मिलिंद याला अनेक मधमाशांनी दंश केला आहे. या घटनेनंतर मिलिंद यांना मधमाशांनी केलेल्या दंशचे काटे काढण्यात आले आहे. सध्या मिलिंद यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.