Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

करेवाडी-तिकोडी ताडी अनुज्ञप्तीकरिता फेर लिलाव बोलीदारांनी लिलावात भाग घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

करेवाडी-तिकोडी ताडी अनुज्ञप्तीकरिता फेर लिलाव बोलीदारांनी लिलावात भाग घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी 



सांगली, दि. 20,  : महाराष्ट्र ताडी दुकाने (लिलाव-नि-निविदा) पध्दतीव्दारे अनुज्ञप्ती देणे) आदेश २००१ नुसार सांगली जिल्ह्यातील ताडी दुकानांचा ताडी वर्ष २०२१-२०२२ (१ ऑक्टोबर २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२२) कालावधी करीताचा जाहीर ई लिलाव-नि-निविदा पध्दतीने www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर लिलाव यशस्वीपणे पार पडलेला आहे. या लिलाव प्रक्रियेमध्ये जत तालुक्यातील करेवाडी-तिकोडी या प्रलंबित राहिलेल्या ताडी अनुज्ञप्तीकरिता फेर लिलाव घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त बोलीदारांनी लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

इच्छुक बोलीदारांनी www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर जावून रजिस्ट्रेशन करून घ्यावे. ई-लिलाव-निविदा प्रक्रियेच्या सर्व अटी / शर्ती व प्रक्रियेबाबतची अधिक माहिती www.mahatenders.gov.in व  sangli.nic.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी सांगली कार्यालय, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सांगली कार्यालय व सर्व क्षेत्रीय निरीक्षक / दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि. सांगली कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.