आठवडा बाजारात गर्दिचा फायदा घेवून मोबाईल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी अटक. मोबाईल चोरीचे एकुण १५ गुन्हे उघडकीस.
सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये झालेल्या मोबाईल चोरी आणि आठवडा बाजारात गर्दिचा फायदा घेवून घडणा-या मोबाईल चोरी बाबत शोध घेवून गुन्हे उघडकीस आणणेबाबतचे आदेश मा. पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम सो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके सो यांनी सांगली शहर पो. ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री अजय सिंदकर यांना दिले आहेत.त्याप्रमाणे मा.अजय सिंदकर पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील एक पथक दिनांक ९/१०/२०२१ रोजी असणा-या शनिवार आठवडा बाजारात पायी पेट्रोलिंग करीत होते त्यावेळी पथकातील कर्मचारी यांना काही इसम हे विनाकारण संशयितरीत्या फिरत आहेत असे निदर्शनास आले.
त्यावेळी पोलीस कर्मचारी यांना संशय आल्याने सदर इसमांना चौकशी करीता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातील एक संशयित इसम गर्दिचा फायदा घेवून पळून | गेला तर दोन इसमांना पाठलाग करून राजवाडा चौक या ठिकाणी पकडण्यात आले. त्यांना त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांचे नाव १) प्रदिप लक्ष्मण भद्रावती ऊर्फ वडर रा. हानगल कुमार ईश्वरनगर | ता.हानगल जि.हवेरी राज्य कर्नाटक सध्या रा. निळा चौक शाहू कॉलेजसमोर कोल्हापूर २) सतीश बसवराज भोई रा. कुडची एस.टी. स्टॅण्डजवळ ता. अथणी जि. बेळगाव राज्य कर्नाटक असे सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.