Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या विकासाला विरोध कुणाचा भारतीय जनता युवा मोर्च्या च्या वतीने दोन्ही पर्याय ठेऊन समांतर पुलाचे काम चालू ठेवण्याचे पालकमंत्र्यानां साकडे घातले

सांगलीच्या विकासाला विरोध कुणाचा भारतीय जनता युवा मोर्च्या च्या वतीने दोन्ही पर्याय ठेऊन समांतर पुलाचे काम चालू ठेवण्याचे पालकमंत्र्यानां साकडे घातले


सांगली 9 ऑक्टोबर 2021:-
कोकणातील सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीने जेव्हा कोसळला तेव्हा मा. आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी आयर्विन पुलाला पर्यायी पुलाची मागणी तत्कालीन मा. मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र्जी फडणवीस व तत्कालीन बांधकाम मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे केली. कारण आयर्विन पुलाला सुद्धा जवळ जवळ १०० वर्षे पुर्ण होत आहेत. व त्यावरील अवजड वाहतूक त्याच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. तेव्हा आयर्विन पुलाला समांतर पुलाची मान्यता मिळाली व बजेटमध्ये तरतूद हि झाली. परंतु पूल मंजूर होऊन आज जवळ जवळ पावणे दोन वर्षे झाली तरी काही लोकांनी त्याला केलेल्या विरोधामुळे हे काम सुरु होऊ शकले नाही. यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. जयंतराव पाटील यांना भारतीय जनता युवा मोर्चा सांगली शहर जिल्हा च्या वतीने निवेदन देण्यात आले. सांगली मधील आयर्विन पुलाला समांतर पुलाच्या बाबतीतचा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री कार्यक्षमपणे घेऊ शकतात. 


तसेच या पुलाच्या समर्थनार्थ व विरोधार्थ असणारे नागरिक यांच्यातील तसेच राजकिय पक्ष व व्यापाराचे हेवे दावे योग्य निर्णय व तडजोडीने सोडवू शकतात. अशी खात्री व विश्वास भारतीय जनता युवा मोर्चा व सांगलीकरांना आहे. आयर्विन पुलानंतर जवळ जवळ १०० वर्षांनी हा पूल होत आहे. तो मंजूर करण्यामध्ये सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना यश आले याचा आनंद पूर्ण सांगलीकर जनतेला आहे. परंतु, काही शुल्लक कारणामुळे तो रद्द होऊ नये. यासाठी पुढाकार घेऊन सामंजस्याने हा निर्णय सोडवून लवकरात लवकर समांतर पुलाचे बांधकाम सुरु होण्यासाठी निणर्य घेण्याची विनंती केली.यावेळी  भाजपा जिल्हा चिटणीस विश्वजित पाटील, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष कृष्णा राठोड, अमित देसाई, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य चेतन माडगुळकर, रोहित परमणे, अभिषेक सावंत, आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.