धावत्या रेल्वेमध्ये २० वर्षीय महिलेवर ८ जणांचा बलात्कार !
मुंबई : इगतपुरीत मुंबईकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये शुक्रवारी एका २० वर्षीय महिलेवर ८ दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.
लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस इगतपुरी दरम्यान असताना हा प्रकार घडला. -कासारा दरोडेखोरांनी ट्रेन घाट परिसरातून जात असताना पीडितेवर अत्याचार केले, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. रेल्वे पोलिसांनी आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे.
या दरोडेखोरांनी रेल्वेत चोऱ्याही केल्या. आरोपींनी ९६ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल चोरला यात मोबाईलचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आतापर्यंत पोलिसांनी ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, दरोडा, चोरी अशा विविध कलमांखाली कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कुसेर खालीद म्हणाले, “रेल्वे घाट परिसरातून जात असताना आरोपींनी महिलेवर अत्याचार केला. आरोपी इगतपुरी रेल्वे स्टेशनवर डी २ या स्लीपर डब्यात चढले आणि घाट परिसरात त्यांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. ट्रेन कसाऱ्यात पोहचल्यावर प्रवाशांनी मदत मागितली. यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत ४ जणांना अटक केली. "पीडिता २० वर्षांची असून तिला महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नेलं आहे. पीडितेची प्रकृती स्थिर आहे. आम्ही सर्व पुरावे गोळा करत आहोत. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. आम्ही आरोपींचे आधीचे रेकॉर्ड्स देखील तपासत आहोत,” अशीही माहिती खालीद यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.