आदित्यराज घोरपडे यांना 'सांगली भूषण'
सांगली : सांगलीचे राष्ट्रीय खेळाडू व एनिमल वेलफेयर ऑफिसर डॉ. आदित्यराज सुभाष घोरपडे यांना २०२१ चा सांगली भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री गणेश मार्केट येथे हा कार्यक्रम पार पडला. श्री गणेश मार्केट सांगली तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर व सांगली भूषण २०२१ या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून सांगली जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या व्यक्तींना सांगली भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महापालिकेचे सहायक आयुक्त नितीन काका शिंदे व गणेश मार्केटचे अध्यक्ष गणेश भाऊ कोडते यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. स्वागत व प्रास्ताविक मार्केटचे सचिव गणेश कांबळे यांनी केले. कार्याध्यक्ष संजय शिंदे यांनी आभार मानले. यावेळी सांगली शहर पोलीस स्टेशन गोपनीय शाखेचे पांडुरंग खरात, विजयंत मंडळाचे सतीश पवार, अल्ताफ शेख, निहाल लांडगे, आप्पासो सागावकर, मेजर कांबळे आदी उपस्थित होते.
डॉ. घोरपडे हे गेली 15 वर्षे केंद्रीय मंत्री मनेकाजी गांधी संचलित पिपल फॉर एनिमल या देशव्यापी संस्थेच्या माध्यमातून प्राणी कल्याण विषयक कार्य करीत आहेत. पक्ष्यांसाठी घरटी, भटक्या जनावराना पिण्याच्या पाण्याची सोय करणे, जखमी पशुंना खाद्य पुरवणे, गाईंसाठी चारा संकलन, भटक्या कुत्र्यांची नसबंदी आदी विविध कार्य घोरपडे यांनी निस्वार्थी भावनेने केले आहे. घोरपडे हे पिपल फॉर एनिमलचे सांगली शहराध्यक्ष असून महापालिकेच्या श्वान नियंत्रण कमिटीचे सदस्य देखील आहेत. ग्राहक पंचायतीचे ते माजी जिल्हाध्यक्ष असून ऊर्जामित्र, रेल्वेमित्र, विशेष कार्यकारी अधिकारी, महामित्र, एनिमल केअर टेकर आदी पदांवरही ते कार्यरत आहेत.
फोटोओळी : डॉ. आदित्यराज घोरपडे यांना 'सांगली भूषण' पुरस्कार प्रदान करताना महापालिकेचे सहायक आयुक्त नितीन काका शिंदे शेजारी श्री गणेश मार्केटचे अध्यक्ष गणेश कोडते, सांगली शहर पोलीस ठाणे गोपनीय शाखेचे पांडुरंग खरात, संजय शिंदे, सतीश पवार, आप्पासो सागावकर आदी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.