Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्ह्यात ९ व १० डिसेंबर रोजी कोविड-१९ महालसीकरण अभियान सर्व पात्र नागरिकांना लस घेण्याचे आवाहन - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

जिल्ह्यात ९ व १० डिसेंबर रोजी कोविड-१९ महालसीकरण अभियान सर्व पात्र नागरिकांना लस घेण्याचे आवाहन - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी



- ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका टाळण्यासाठी 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण गरजेचे

- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी, कोरोना होवू नये अथवा झाल्यास त्याचा गंभीर प्रतिकूल परिणाम होवू नये यासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस अनिवार्यच


सांगली, दि. 6, : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर  होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी व त्याचा प्रतिबंध करण्यासाठी 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे संपूर्ण लसीकरण पहिला व दुसरा दोन्ही डोस होणे गरजेचे आहे. याकरीता जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण मोहिम सुरू असून दि. 9 व 10 डिसेंबर 2021 या दिवशी चार लाखाहून अधिक नागरिक कोविड-19 लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी पात्र होत आहेत. दि. 9 व 10 डिसेंबर रोजी कोविड-19 महालसीकरण अभियान दिवस टप्पा दोन राबविण्यात येत आहे. या दिवशी ज्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस विहीत कालावधी संपूणही अद्याप घेतला नाही त्यांनी तसेच ज्यांनी अद्यापही कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही अशांनी या अभियानामध्ये लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

दिनांक 9 व 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या कोविड-19 महालसीकरण अभियानाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात दि. 9 व 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या कोविड-19 लसीकरण अभियानामध्ये 4 लाखाहून अधिक नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत. तसेच पात्र असूनही अद्याप कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेले जवळपास 15 टक्के नागरिक आहेत. अशांच्या लसीकरणासाठी महालसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी महानगरपालिकेचे काही प्रभाग, जत, आटपाडी, खानापूर या तालुक्यातील लसीकरणाचे प्रमाण जिल्ह्यातील उर्वरीत तालुक्याच्या तुलनेत कमी आहे. या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी लसीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही केले. यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी, कोरोना होवू नये अथवा झाल्यास त्याचा गंभीर प्रतिकूल परिणाम होवू नये यासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस अनिवार्यच असल्याचे अधोरेखित केले.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्ह्यातील ज्या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी शिक्षक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत लसीकरणासाठी प्रयत्न होत आहेत. सरपंच, ग्रामपंचायतींना त्यांच्या गावातील प्रलंबित लोकांची यादी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांनी नागरिकांना एकत्रित करणे, त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत आणणे याचे नियोजन करावे असे सांगितले. आत्तापर्यंत जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात १५ लाख ९ हजार २३५ नारिकांनी  पहिला डोस घेतला असून तर ९ लाख ११ हजार २३९ नारिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्याचवेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील ३ लाख ३३ हजार २०१ नागरिकांनी पहिला तर २ लाख १६ हजार ५३७  नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. संपूर्ण जिल्ह्यात ८४.४८ टक्के नागरिकांनी पहिला तर  ५१.७१ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. २७६ गावांतील १०० टक्के नागरिकांचा पहिला डोस झाला असून १५ गावातील १०० टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त डोसेस व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध असल्याचे सांगून ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हार्ड इम्युनिटी वाढविण्यासाठी, कोरोनापासून बचावासाठी पात्र नागरिकांनी या मोहिमेत प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी परदेशातून गत महिन्यात 130 नागरिक जिल्ह्यात आले होते. या सर्वांचे टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाले असून यामध्ये कोणीही कोरोना पॉझीटव्ह नसल्याचे सांगितले. कोरोना लसीकरण अभियान काळात जिल्ह्यात जवळपास 450 हून अधिक लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दि. 9 व 10 डिसेंबर रोजी राबविण्यात येणाऱ्या महालसीकरण अभियानासाठी महानगरपालिकेनेही 67 सत्रांचे आयोजन केले आहे. यासाठी 258 कर्मचाऱ्यांची, 20 सुपरवायझर यांची नियुक्ती केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.