राज्यात लाॅकडाऊन लागण्याचे संकेत
मुंबई,: मागील दोन वर्षांपासून कोरोना या शब्दाभोवती फिरत असलेले मानवी आयुष्य याबाबतीत अजूनही अस्थिरच आहे. वेगवेगळ्या व्हेरियंटच्या माध्यमातून कोरोना सध्या चिंता निर्माण करत आहे.सध्या कोरोनाच्या ओमिक्राॅन या नव्या व्हेरियंटने आपल्याला पुन्हा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर उभं केलं आहे. या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरी क्षेत्रातील तज्ज्ञांनी राज्यात लाॅकडाऊन लागण्याचे संकेत व्यक्त केले आहेत.
सध्या अवघ्या जगावर ओमिक्राॅनचा धोका निर्माण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतून ओमिक्राॅनच्या व्हेरियंटचा प्रसार व्हायला सुरूवात झाली आहे. भारतातही ओमिक्राॅनचे रुग्ण आढळायला लागले आहेत सद्यःस्थितीत भारतात एकुण चार रूग्ण आहेत. यातील 2 कर्नाटक, 1 गुजरात, 1 महाराष्ट्र अशी रूग्ण संख्या आहे. या नव्या व्हेरियंटबाबत अनेक तज्ज्ञ आपली संशोधक मतं व्यक्त करत आहेत.
तज्ज्ञांच्या मते लहान मुलांची प्रामुख्यानं जास्त काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. कारण दक्षिण आफ्रिकेत जे रूग्ण आढळले आहेत त्यात जास्त प्रमाणात लहान मुलं आहेत, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. मास्क वापरण्यात यावेत. वयोवृद्ध आणि लहान मुलांना या नव्या व्हेरियंटचा धोका अधिक आहे. परिणामी आपण काळजी घेतली नाही तर लाॅकडाऊन लावावं लागण्याची शक्यता आहे, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, सध्या सर्वत्र ओमिक्राॅचा प्रसार हा डेल्टापेक्षा पाचपट जास्त वेगाने होत आहे. परिणामी सध्या सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.