Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यानंतर आता राजस्थानात ओमायक्रॉन व्हॅरियंटचा 'विस्फोट'

 पुण्यानंतर आता राजस्थानात ओमायक्रॉन व्हॅरियंटचा 'विस्फोट'


नवी दिल्ली : पुण्यानंतर आता राजस्थानातील जयपूरमध्ये देखील करोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हॅरियंटचा विस्फोट झाला आहे. जयपूर येथील एकाच कुटुंबातील ९ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे वृत्त समोर आले असून यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

एक दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह जयपूर येथे दाखल झालं होत. प्रवासात त्यांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली. ते घरी परतल्यानंतर त्यांच्यामुळे कुटुंबातील इतर ५ जणांना बाधा झाले. यामुळे आता कुटुंबातील एकूण ९ सदस्यांना ओमायक्रॉनने गाठले आहे. हे दाम्पत्य २५ नोव्हेंबरला भारतात दाखल झाले होते.

दरम्यान, आज सायंकाळच्या सुमारास पिंपरी-चिंचवड येथे देखील २४ नोव्हेंबरला नायजेरिया देशातून आलेली ४४ वर्षीय महिला व तिच्या सोबत आलेल्या २ मुली यांच्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात राहणार तिचा भाऊ आणि त्याच्या २ मुली यांना ओमायक्रॉनची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. तर पुण्यात देखील एक रुग्ण आढळला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.