कर्मवीर पतसंस्थेने सामान्य सभासदासाठी मोठे काम केले :- रोहित आर. पाटील कवठे एकंद शाखा प्रशस्त वास्तुत स्थलांतर प्रसंगी काढले उद्गार
कवठे एकंद:- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या.. सांगली च्या कवठे एकंद ता. तासगांव येथील शाखेचे प्रशस्त वास्तुत स्थलांतर कार्यक्रम युवा नेते मा. रोहित आर. आर. पाटील यांचे अमृतहस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील होते.
स्वागत संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे यांनी केले प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी संस्थेच्या अर्थकारण प्रगती तंत्रज्ञान ग्राहकसेवा समाजसेवा या क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी संस्थेच्या सांपत्तीक स्थितीची माहिती दिली. संस्थेचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन कोअर बँकींग असून संस्थेच्या ठेवी ६०२ कोटी असून कर्ज वाटप रु. ४६२ कोटी, भागभांडवल २३ कोटी ५० लाख आहे. स्वनिधी रु. ५७ कोटी गुंतवणुक १८ कोटी आहे. तर संस्थेचा एकूण व्यवसाय १५०० कोटी कडे वाटचाल करीत आहे. संस्थेस सतत ऑडीट वर्ग अ आहे. व संस्थेने नेहमी ग्राहक सेवेला अग्रक्रम दिल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. रोहित आर. पाटील यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. संस्थेने सभासदांचे हित जोपासून कर्मवीर आण्णांचे विचार आत्मसात केल्याचे नमुद केले. पुरस्थिती कोरोना अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले असून सहकारी संस्थांनी त्यांना उभे करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले. नवउद्योजकांना कर्ज रुपाने मदत केल्यास देश निर्मितीस आपला हातभार लागेल असे ते म्हणाले कर्मवीर पतसंस्था सहकारामध्ये आदर्श ठरेल असा आशावाद त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
या प्रसंगी कवठे एकंद चे सरपंच श्री. राजेंद्र धनपाल शिरोटे यांचेसह स्थानिक शाखा सल्लागार शिराज दस्तगीर मुजावर, भाऊसो भुपाल कोगनोळे, राजकुमार कल्लाप्पा लंगडे, डॉ. महावीर जयपाल चौगुले, शांतीनाथ चामण चिप्रीकर, बाळासो शिरोटे, बबन यशवंत नागजे डॉ. प्रशांत किंकर यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक अॅड. एस. पी. मगदूम डॉ. रमेश वसंतराव ढवू, अं. के. चौगुले (नाना) लालासो भाऊसो थोटे, सौ. ललिता अशौक सकळे, तज्ञ संचालक डॉ. एस. बी. पाटील (मोटके) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे सभासद सेवक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे संस्थेचे संचालक श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले यांनी मानले. सुत्रसंचलन संजय सासणे यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.