Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठाकरे घराण्याची सून होणार हर्षवर्धन पाटील यांची कन्या

 ठाकरे घराण्याची सून होणार हर्षवर्धन पाटील यांची कन्या


मुंबई : माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे घराण्याची सून होणार आहे. येत्या 28 डिसेंबर रोजी निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी तिचा विवाह होणार आहे. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेतली आणि लग्नाचे निमंत्रण दिले. मुंबईमध्ये येत्या 28 डिसेंबरला निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांचा विवाह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निहार ठाकरे हे नातू आहेत. 1996 मध्ये निहार यांच्या वडील बिंदुमाधव यांचे अपघाती निधन झाले होते. निहार यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे सख्खे काका आहेत, तर राज ठाकरे हे त्यांचे सख्खे चुलत काका आहेत. निहार ठाकरे हे पेशाने वकील आहेत. 

अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. अंकिता पाटील या काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्या असल्या तरी गेल्या काही दिवसापासून त्यांनी भाजपशी जवळीक साधली आहे. ठाकरे-पाटील विवाहामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. विवाहाच्या निमित्ताने पाटील यांचे मूळ गाव असलेल्या बावडा येथेही गावकऱ्यांसाठी थाटामाटाने भोजनसोहळा 17 डिसेंबर रोजी होणार आहे.

महाराष्ट्रात राजकीय कुटुंबात सध्या विवाहाची धामधूम पार पडत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गुलाबराव पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या घरात लग्नकार्ये पार पडली. आता यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या घरीही विवाहाची धामधूम सुरु झाली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.