अश्लील चित्रफित पाहून पाच वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन हत्या, घटनेने साताऱ्यात खळबळ
सातारा, 8 डिसेंबर : साताऱ्यात एका पाच वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मोबाइलवर अश्लील चित्रफित पाहत त्याचे अनुकरण करत अनैसर्गिक कृत्य केलं.
धक्कादायक म्हणजे आरोपी हा सुद्धा अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. आधी अनैसर्गिक अत्याचार आणि मग... मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीने मोबाइलवर अश्लील व्हिडीओ पाहून हे कृत्य केलं आहे.
इतकेच नाही तर कुणालाही घडलेला प्रकार कळू नये म्हणून आरोपीने अल्पवयीन मुलाची हत्या केली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. घरातील किचनमध्ये आढळून आला मृतदेह मंगळवारी (7 डिसेंबर) रोजी ही घटना उघडकीस आली आहे. मृतक मुलाच्या वडिलांना घरातील किचनमध्ये मृतदेह आढळून आला.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आला, त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी तात्काळ घडलेला प्रकार पोलिसांना कळवला. पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी संबंधित संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.