Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या आरडीएक्स सारेगमा ग्रुपचे इंडियन आयडल मराठी स्पर्धेत यश : सात गायकांना मिळाली इंडियन आयडॉल मराठीची विजेती ट्रॉफी

सांगलीच्या आरडीएक्स सारेगमा ग्रुपचे इंडियन आयडल मराठी स्पर्धेत यश : सात गायकांना मिळाली इंडियन आयडॉल मराठीची विजेती ट्रॉफी


सांगली: सोनी टीव्ही मराठीवर चालू असलेल्या इंडियन आयडल मराठीसाठी पार पडलेल्या  स्वररथ गायन स्पर्धत सांगलीच्या आरडीएक्स सारेगमा ग्रुपने घवघवीत यश संपादन करीत इंडियन आयडॉल मराठी स्पर्धेचा किताब पटकावला आहे. जयसिंगपूर येथे या स्पर्धा पार पडल्या. 

    या स्पर्धेत सांगलीच्या आरडीएक्स ग्रुपच्या आठ ते दहा सदस्यांना इंडियन आयडॉल मराठीची ट्रॉपी मिळाली.  सांगलीचे प्रसिद्ध कराओके सिंगिंग ग्रुप

आरडीएक्स सारेगामाच्या सर्व टीमने या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. ग्रुपचे डायरेक्टर रामकृष्ण नाईक व त्यांचे सहकारी सुहास फडतरे , अनिस जमादार,सोनाली केकडे, बबन कांबळे, प्रदीप माने, लीना यादव यांना या स्पर्धेत विजेते घोषित करून सोनी टीव्ही चैनलने त्यांना इंडियन आयडलची ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव केला. आरडीएक्स ग्रुप सांगलीच्या खणभाग लाळगे गल्लीतील विठ्ठल मंदिरात सुरू असून मागील दोन वर्षांपासून।या ग्रुपने अनेक स्पर्धेत सहभागी होत यश संपादन केले आहे. गायन क्षेत्रात राम नाईक आणि।त्यांच्या टीमकडून नवोदित गायकांना संधी दिली जात असून अनेक नवोदित या ग्रुपमुळे गायन क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत. त्यातच नुकताच इंडियन आयडॉल मराठी च्या गायन स्पर्धेत ग्रुपच्या सदस्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे आरडीएक्स टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.