भारताच्या विकासात अल्पसंख्याक समाजाचे बहुमोल योगदान..अल्पसंख्याक हक्क दिनी प्रतिपादन. रावसाहेब जिनगोंडा पाटील.. चेअरमन
सांगली दि. १८: आज सांगली जैन बोर्डिंगच्या सभागृहात दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पदाधिकारी बैठक केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सभेतर्फे अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी चेअरमन रावसाहेब पाटील नाना म्हणाले, 'भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय कृषी, साहित्य.. संस्कृती.. शिल्पकला.. क्रिडा इ. क्षेत्रात अल्पसंख्याक समाजातील लोकांनी भरीव योगदान दिले आहे. जैन समाज याबाबत कायमच आघाडीवर आहे. आज जगभर व भारतात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा होतो आहे. दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने स्व. दि. ब. अण्णासाहेब लठ्ठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करीत आहोत. यापुढेही जैन समाज बहुजन समाजसेवेत अग्रेसर राहील आणि याचा समाजाला आनंद आहे' असे प्रतिपादन त्यांनी केले.

सांगली जैन बोर्डिंगच्या सभागृहात सभेतर्फे आयोजित अल्पसंख्याक हक्क दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. एन.डी. बिरनाळे यांनी केले. यावेळी सुरेश पाटील समडोळी, दिलीप वग्याणी आष्टा, काकासाहेब धामणे, मालगाव, दादासाहेब पाटील चिंचवाडकर रविंद्र देवमोरे, सुदर्शन हेरले,अॅड. जयंत नवले, अजित भंडे, राहुल चौगुले, दक्षिण भारत जैन सभेचे व शाखांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.