Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या कृष्णा नदीच्या घाटावर आजपासून कृष्णा नदी उत्सवाला सुरवात

 सांगलीच्या कृष्णा नदीच्या घाटावर आजपासून कृष्णा नदी उत्सवाला सुरवात 


पहिल्याच दिवशी शासकीय कर्मचाऱ्यानी केला घाट स्वच्छ जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग आणि सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून संयुक्त स्वच्छता मोहीम 

सांगली  : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या जलसंपदा विभागाकडून शुक्रवारपासून 17 डिसेंबरपासून सांगलीच्या कृष्णा नदीच्या घाटावर कृष्णा नदी उत्सवाला सुरवात झाली. पुढील सात दिवस सांगलीत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी कृष्णा नदी उत्सव साजरा केला जाणार आहे. महापालिकेसह विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यानी यात सक्रिय सहभाग घेतला.


    यानिमित्त सांगलीच्या कृष्णेच्या घाटावर कृष्णेचे पाणी असणारा कलश पूजन करत या सात दिवसांच्या कृष्णा नदी उत्सवाला सुरवात झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, सूर्यकांत नलवडे, सचिन पवार, राजन डवरी , महापालिकेचे सहायक आयुक्त नितीनकाका शिंदे, नदी स्वछतेसाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते सतीश दुधाळ, अधीक्षक जे.के महाडिक यांच्यासह शासकीय निमशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आजपासून नदी घाटाची स्वछता हाती घेणेत आली असून पुढील दोन दिवस कृष्णा नदीच्या सर्व घाटाची स्वच्छता केली जाणार आहे. पुढील सात दिवस कृष्णा नदीच्या उत्सवानिमित्त होत असणाऱ्या विविध कार्यक्रमात जलसंपदा, महानगरपालिका, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, एनजीओ, शालेय शिक्षण विभाग, प्रदूषण महामंडळ, कृषी विभाग आणि जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय यांचे अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत. आजच्या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांनीही सहभाग घेत उपक्रमात सहभाग घेतला. दोन तास झालेल्या स्वच्छता मोहिमेत  कचरा संकलित करण्यात आला. हा सर्व कचरा महापालिका प्रशासनाकडून तात्काळ उचलण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जलसंपदा विभागाच्या प्रतिनिधी संगीता मोरे यांनी केले. या कृष्णा नदी घाटाच्या स्वच्छता मोहिमेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.


नदी घाट स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे 110  कर्मचारी आणि 10 घंटागाड्यांचा सहभाग


जलसंपदा विभागाकडून कृष्णा नदी घाटावर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे 110 कर्मचारी आणि 10 घंटागाड्यांचा ताफा सहभागी झाला होता. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी,  उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नितीन शिंदे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे, किशोर कांबळे, गणेश माळी यांच्यासह आरोग्य विभागाच्या टीमकडून स्वछता करीत गोळा झालेला कचरा संकलन करण्यात आला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.