शकुनी काकामुळे आरक्षण मिळत नाही - आमदार पडळकर
सांगली : ओबीसी आरक्षण स्थगितीबाबत न्यायालयाच्या निकालावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकार आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. ओबीसी आरक्षण बाबतीत प्रस्थापितांच्या नौटंकीचा पर्दाफाश झाला आहे. आता हक्क मागून नाही तर हिसकावून घ्यावा लागेल, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शकुनी काकाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारकडून आरक्षण मिळणार नाही, अशी टीका शरद पवारांचे नाव न घेता केली आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.
प्रस्थापितांच्या नौटंकीचा फर्दाफाशओबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच न्यायलयाच्या आजच्या निर्णयावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.आमदार पडळकर म्हणाले, आजच्या निर्णयामुळे प्रस्थापितांच्या संपूर्ण नौटंकीचा महाराष्ट्रातील बहुजनांपुढे पर्दाफाश झाला आहे. सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले होते की, अध्यादेश काढण्यापूर्वी इंपरीकल डेटा गोळा करा त्यानंतरच अध्यादेश काढा. पण, प्रस्थापितांना आपल्या उमेदवारांसाठी मार्ग मोकळा करायचा होता. म्हणूनच त्यांनी नावापुरता अध्यादेश काढला. सुरुवातीपासूनच प्रस्थापितांकडून ओबीसींचा पुळका असल्याचा आव आणला जातो आहे, आज हे पुन्हा सिद्ध झाले, अशी टीका पडळकर यांनी केली.
शकुनी काकामुळे आरक्षण मिळणार नाही
वेळ असताना आयोगाला बसायला खुर्ची दिली असती, मानधन दिले असते तर आज आमच्या बहुजनांचे हक्क हिरावले गेले नसते. तर न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आगोयाला पैसे दिले गेले. तेही पन्नास कोटींची गरज असताना फक्त पाच कोटी दिले गेले. त्यामुळे मी या प्रस्थापितांच्या सरकारचा निषेध करतो. तसेच मी सर्व बहुजनांना आव्हान करतो की, आपला हक्क घेतल्या शिवाय मिळाणार नाही. जोपर्यंत शकुनी कांकाच्या इशाऱ्यावर हे प्रस्थापितांचे सरकार चालत आहे, तोपर्यंत हे फक्त असे दाखवण्यापुरते नाटक करून तोंडाला पानं पुसण्याचे काम करतील. त्यामुळे आता एका लढा उभारू, असे आव्हानही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.