मुलींच्या लग्नाच्या वयाबद्दल मोठी बातमी, वय वाढवण्यासंबंधीच्या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी
१६ डिसेंबर २०२१ : केंद्रीय मंत्रिमंडळाने मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
केंद्र सरकार विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी संसदेत प्रस्ताव मांडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात मुलींचे लग्नाचे वय 21 वर्षे करण्याबाबत उल्लेख केला होता. मुलींना कुपोषणापासून वाचवायचे असेल तर त्यांचे लग्न योग्य वेळी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले होते.
सध्याच्या कायद्यानुसार देशातील पुरुषांसाठी लग्नाचे किमान वय २१ आणि महिलांचे १८ वर्षे आहे, परंतु सरकार आता महिलांना सक्षम करण्यासाठी लग्नाचे वय वाढविण्याचा विचार करत आहे. बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सरकार सुधारणा करणार आहे.
महिला सक्षमीकरणासाठी पावले उचलली: जया जेटली
जून 2020 मध्ये सरकारने याबाबत एक टास्क फोर्सही स्थापन केला होता. टास्क फोर्सने त्याच वर्षी लग्नाचे वय वाढवण्याच्या प्रस्तावावर आपला अहवाल सादर केला. समता पक्षाच्या माजी सदस्य आणि टास्क फोर्सच्या प्रमुख जया जेटली यांनी याची शिफारस केली होती. हे पाऊल लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नसून महिला सक्षमीकरणासाठी होते.
टास्क फोर्सने सांगितले की, पहिल्या मुलाला जन्म देताना मुलींचे वय 21 वर्षे असावे. लग्नाला उशीर झाल्याने कुटुंब, महिला, मुले आणि समाज यांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.