नागपूरमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण, महाराष्ट्रात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या १८ पार
नागपूरमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आला आहे. मागील दिवसांतील चाचपणी केली असता मुंबई आणि पुण्यानंतर आता ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण नागपूरमध्ये आढळून आला आहे. या व्यक्तीचं वय ४० वर्ष असं आहे.या ४० वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉनच्या व्हेरियंटची लागण झाली आहे. त्यामुळे आता राज्यात ओमिक्रॉनच्या रूग्णांची संख्या १८ च्या वर पोहोचली आहे. हा रूग्ण दक्षिण आफ्रिकेतून आल्याचं सांगितलं जात आहे. ही व्यक्ती नागपुरात परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंगही करण्यात आली होती. त्यामुळे त्या व्यक्तीला ओमिक्रॉन झाल्याचे स्पष्ट झाले.
राज्यात ओमिक्रॉनची संख्या १८ पार होती. त्य़ापैकी आता ७ जणं ओमिक्रॉन मुक्त झाले आहेत. मुंबईत चार , पुणे एक आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा एक रूग्ण आढळून आला होता. परंतु आता मुंबई, पुणेनंतर नागपूरमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे.कर्नाटकमध्ये आज ओमिक्रॉनचे तीन रूग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रॉनचा एक ३४ वर्षीय रूग्ण पॉझिटिव्ह सापडला होता. हा रूग्ण दक्षिण आफ्रिकेतून परतला होता. आंध्रप्रदेश आणि चंदीगड मध्ये ओमिक्रॉनचे नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशात ओमिक्रॉनचे एकूण ३७ रूग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर म्हणाले की, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ५ प्राथमिक आणि १५ दुय्यम संपर्कांचा शोध घेण्यात आला आहे. त्यांचे नमुनेही टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. ओमिक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तीचं विलिगीकरण करण्यात आलं असून त्याच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, चंदीगडमध्ये एका २० वर्षीय तरुणाचा अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा व्यक्ती २२ नोव्हेंबरला इटलीहून परतला होता. त्यानंतर त्याची टेस्ट केली असता १ डिसेंबर रोजी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.