सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख 12 रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी कार्यादेश जारी – मनपा क्षेत्रात पावसाळा कालावधीत अनेक मुख्य रस्ते खराब झाल्याने हे रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी (Hot mix पद्धतीने) निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन आज अंतिम मान्यता देण्यात आली. हे रस्ते 15 जानेवारीपर्यंत सुस्थितीत आणण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत. हे प्रमुख रस्ते खालीलप्रमाणे –
1) सांगली कॉलेज कॉर्नर ते आपटा पोलीस चौकी रस्ता.
2) आपटा पोलीस चौकी ते कॉंग्रेस भवन रस्ता.
3) सिव्हिल हॉस्पिटल चौक ते दिगंबर मेडिकल (100 फुटी रोड) रस्ता.
4) शास्त्री चौक, सांगली ते सिव्हिल हॉस्पिटल चौक रस्ता.
5) पटेल चौक, सांगली ते सांगली कॉलेज कॉर्नर रस्ता.
6) कन्या शाळा ते राम मंदिर चौक (मारुती रोड) रस्ता.
7) पुष्पराज चौक ते हॉटेल पै प्रकाश (Service road) रस्ता.
8) वंटमुरे कॉर्नर ते हिरा हॉटेल चौक, मिरज रस्ता.
9) किरण हॉटेल चौक ते चप्पल मार्केट चौक, मिरज रस्ता.
10) बसवेश्वर चौक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा चौक रस्ता.
11) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते बसवेश्वर महाराज पुतळा चौक, मिरज रस्ता.
12) शास्त्री चौक परिसरातील अंतर्गत रस्ते.
याचसोबत गुंठेवारी भागातील कच्च्या रस्त्यांचे मुरुमीकरण करण्यासाठी 3 कोटी रुपये किमतीची निविदाही अंतिम मान्यतेसाठी स्थायी समितीकडे सादर केली आहे. ही कामेसुद्धा लवकरच सुरू होतील. मनपा क्षेत्रातील अन्य रस्तेही मनपाच्या पॅचवर्क यंत्रणेमार्फत सुस्थितीत आणण्यात येणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.