वसंतदादा रूग्णालयाच्या बांधकामासाठी १.९० कोटींच्या निधीस प्रशासकिय मान्यता काम लवकरच सुरू होणार - पृथ्वीराज पाटील यांची माहिती
सांगली, दि. १३ : पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयाच्या (सिव्हिल)100 खाटाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचे इमारती मधील बांधकाम तसेच दोन्ही बाजूच्या टॉयलेट ब्लॉकचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी, ९० लाख, ६३ हजार,२४७ रुपयांच्या प्रशासकिय मान्यता मिळाली असून सदर काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज येथे दिली.
वसंतदादा रुग्णालय हे जिल्ह्याचे मुख्य सुविधा केंद्र आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये तिसऱ्या मजल्याच्या बांधकामाचे काम करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते, त्यामुळे 100 खाटांची ही इमारत दीड वर्षापासून वापराविना पडून होती. त्यानुसार हे बांधकाम करणे आवश्यक असून त्यासाठी निधी मिळावा याकरिता आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांची भेट घेऊन पाठपुरावा केलेला होता, याबाबत वसंतदादा रूग्णालय व मिरज सिव्हील हॉस्पीटलच्या वेगवेगळ्या कामाबाबत त्यांनी अधिका-यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्येच राखीव निधीस मंजूर करणेचे आदेश दिले होते. त्यास आता प्रशासकिय मान्यता मिळाली असल्याने याचे बांधकाम त्वरित सुरू होईल असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.