महापालिका कर्मचाऱ्यांची हजेरी फेसरिडिंगद्वारे हजेरी सुरू : महापालिकेच्या 2737 कर्मचाऱ्यांची होणार हजेरी आता फेसरीडिंगवर: 15 डिसेंबर पासून यंत्रणाही कार्यांवित:
सांगली: महापालिका कामकाजात शिस्त निर्माण व्हावी या उद्देशाने महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची बुधवार दिनांक 15 डिसेंबर पासून फेसरीडींगद्वारे हजेरी सुरू झाली आहे. यामुळे आता कार्यालयीन कामकाजात गतिमानता येणार असून शिस्तही लागणार आहे.
महापालिका कर्मचारी वेळेवर कामावर हजर नसतात अशा नागरिक आणि सदस्यांच्या तक्रारी आहेत. बहुतांशी कर्मचारी हे वेळेवर प्रामाणिकपणे कामावर येतात मात्र अनेक कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे समोर आले होते . त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर येण्याची सवय लागावी आणि कामकाजात गतिमानता यावी यासाठी मनपा आयुक्त नितिन कापडणीस यांनी सर्वच कामगारांची फेस रिडींग द्वारे हजेरी घेण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले आहेत. यानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचे फेसरीडींग नोंदणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये एकूण कर्मचारी 2737 असून यामध्ये कायम कर्मचारी 1468, मानधन कर्मचारी 420, स्वच्छता कर्मचारी 499 आणि बदली / संपकालीन कर्मचारी 340 आशा 2737 कर्मचाऱ्यांचे फेसरीडींग घेनेत आले आहेत. फेसरीडिंगद्वारे हजेरी बुधवार पासून सुरू करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेत काम करणाऱ्या प्रत्येकास दररोज सकाळी 9:45 वाजता आपली फेसरीडिंग द्वारे हजेरी द्यावी लागणार आहे तर सायंकाळी 6:15 वाजता बाहेर पडण्याची हजेरी द्यावी लागणार आहे.
तसेच मध्यंतरीच्या वेळेत हालचाल रजिस्टर द्वारे सुद्धा कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे. बुधवारपासून प्रत्यक्ष फेसरीडिंगवर हजेरी सुरू झाली आहे. यामुळे आता कर्मचारी वेळेत कामावर येण्यास मदत होणार आहे शिवाय शिस्तही लागणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.