Omicronच्या धोक्यामुळे केंद्र सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय!
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंटमुळे ओमिक्रॉनचा वेगानं संसर्ग होत आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशांकडून काही निर्बंध लावण्यात येत आहेत.केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आले आहे.
ऑमिक्रॉनचा धोका ओळखून भारताने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. कारण सुरूवातील दक्षिण आफ्रिकेत आढलेला ओमिक्रॉन बघता बघता भारतात पोहोचला. दक्षिण आक्रिकेतून डोंबिलित आलेला तरूणही ओमिक्रॉनबाधित निघाला. त्यामुळे राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंद घालण्याची मागणी केली होती.
15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ओमिक्रॉनचा वाढता प्रसार पाहता हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. अलिकडेच समोर आलेल्या संशोधनातून काही नवी माहिती समोर आली आहे. ओमिक्रॉनचा प्रसार हा डेल्टापेक्षाही अधिक वेगाने होतो आहे.
दक्षिण आफ्रिकेचे शेजारी देशात याच्या प्रसाराचा वेग वाढला आहे. बोत्सवाना, इस्वातिनी, झिम्बाब्वे, त्यानंतर ब्राझिल, अमेरिका, कॅनडा, युरोपमध्ये अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन आढळल्यानंतर भारत, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, साऊदी अरेबिया अशा आता जगभरात तब्बल 40 देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाल्यानं चिंतेत आणखी भर पडलीय. ओमिक्रॉनचा सर्वात जास्त फैलाव ख्रिश्चन बहुल राष्ट्रांमध्ये होण्याची शक्यता आहे.
इंग्लंडमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनचे तब्बल 104 रुग्ण आढळले. घाना या देशात ओमिक्रॉनचे 34 रुग्ण आहेत. कॅनडामध्ये ओमिक्रॉनचे 15 रुग्ण आढळलेत. नेदरलँडमध्ये 16 रुग्ण, नॉर्वेमध्ये 13 रुग्ण आढळलेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोर्तूगालमध्ये 13 रुग्ण, जर्मनीमध्ये 10 रुग्ण, ऑस्ट्रेलियात 8 रुग्ण, तर दक्षिण कोरियात ओमिक्रॉनचे 9 रुग्ण आढळलेत.
ओमिक्रॉनच्या फैलावासोबतच युरोप आणि अमेरिकेत कोरोनाच्या डेल्टा व्हायरसने हाहा:कार माजवलाय. अमेरिकेत सलग पाचव्या दिवशी 1 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.
गेल्या 5 दिवसात अमेरिकेत रोज कोरोनामुळे 1500 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झालाय. लस न घेतलेल्यांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण अधिक आहे. लस न घेतलेल्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. तिकडे युरोपमध्येही वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये तिथल्या सरकारांची चिंता वाढली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.