Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुधगाव येथील 4 कोटी 88 लाखाच्या विविध विकास कामांचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

दुधगाव येथील 4 कोटी 88 लाखाच्या विविध विकास कामांचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ


सांगली, दि. 9,  : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागात उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी विविध विकास योजना शासन राबवित आहे. त्या अंतर्गत मिरज तालुक्यातील दुधगाव येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते आज 4 कोटी 88 लाखाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.       

दुधगाव गावातील विविध विकास कामांचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जि. प. सदस्या सुरेखा आडमुठे, मिरज तहसीलदार डी. एस. कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभगाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, सरपंच विकास कदम, बाळासाहेब पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.    


पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या विविध विकास कामांमध्ये कर्मवीर चौक ते दत्त मंदिर कॉंक्रीट रस्ता गटर व फ्लाईट पाईपलाईन करण्यासाठी सी आर एफ फंडातून 4 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुधगाव ग्रामसचिवालय इमारत बांधण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियानातून 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. डिग्रज वाट ते सर्वोदय कारखान्याकडे जाणारा पाणंद रस्ता यासाठी पालकमंत्री शेत पाणंद रस्ते विकास योजनेतून 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आवटी शेत ते आडमुठे तळे रस्त्यासाठी आमदार फंडातून 7 लाख रुपये, कवठेपिरान रस्ता गणेश मंदिरापासून दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जनसुविधा योजनेतून 10 लाख रुपये, म्हसोबा मंदिर ते सर्वोदय कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 25/15 योजनेतून 20 लाख रुपये, डिग्रज रस्ता ते दिनकर गावडे घर व दिलीप दळवी घर रस्ता खडीकरण व मुरमीकरण, शिवगोंडा पाटील (पासगोंड) घर ते हुतात्मा बझार पर्यंत आरसीसी गटरसाठी 11 लाख रुपये अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे. ही सर्व कामे दर्जेदार व उत्तम प्रतीची होतील यासाठी संबंधित यंत्रणांनी त्यानुसार काम करावे, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.