Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता बँक खात्यात ठेवावे लागणार किमान १० हजार; अन्यथा ग्राहकास ६०० रुपये दंड

 आता बँक खात्यात ठेवावे लागणार किमान १० हजार; अन्यथा ग्राहकास ६०० रुपये दंड


नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपल्या सर्वच सेवांचे शुल्क वाढविले आहे.

पीएनबीच्या शहरातील शाखेत खाते असल्यास आता खात्यावर किमान १० हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतील. पीएनबीच्या शुल्कवाढीचा इतर बँकांकडून कित्ता गिरवला जाण्याची शक्यता असल्यामुळे देशातील बँकिंग सेवा महागण्याची शक्यता आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या संकेतस्थळावर सेवा शुल्काच्या वाढीची माहिती देण्यात आली आहे. नवीन शुल्क १५ जानेवारीपासून लागू होईल. खात्यात किमान शिल्लक मर्यादा आधी ५ हजार रुपये होती. आता किमान १० हजार रुपये खात्यावर ठेवावे लागतील. खात्यात १० हजारांपेक्षा कमी रक्कम राहिल्यास ग्राहकास ६०० रुपये दंड लागेल. दंडाची ही रक्कम आधी ३०० रुपये होती.

पीएनबीच्या ग्रामीण भागातील शाखांसाठी किमान शिल्लक मर्यादा १ हजार रुपये कायम ठेवण्यात आली असली तरी एवढी शिल्लक नसल्यास आता ४०० रुपये दंड लागणार आहे. आधी दंडाची रक्कम २०० रुपये होती. पीएनबीने आपल्या लॉकर शुल्कात ५०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. छोट्या लॉकरचे शुल्क ग्रामीण भागासाठी १,००० रुपयांवरून १,२५० रुपये, तर शहरी भागासाठी १,५०० रुपयांवरून २,००० रुपये करण्यात आले आहे. सर्वांत मोठ्या आकाराच्या लॉकरचे शुल्क शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी १०,००० रुपये असे कायम ठेवण्यात आले आहे.


खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता चुकला अथवा डेबिट अकाऊंटमध्ये पैसे नसतील, तर लागणारा दंड १०० रुपयांवरून २५० रुपये करण्यात आला आहे. डिमांड ड्राफ्ट रद्द करण्यासाठीचे शुल्क १०० रुपयांवरून १५० रुपये करण्यात आले आहे. चेक परत आल्यास १ लाखांपर्यंतच्या रकमेवर लागणारे शुल्क १०० रुपयांवरून १५० रुपये, तर एका लाखावरील रकमेवरील शुल्क २०० रुपयांवरून २५० रुपये करण्यात आले आहे.

ग्राहकांना बसणार असा फटका...

१० हजारांपेक्षा कमी रक्कम राहिल्यास ग्राहकास ६०० रुपये दंड

छोट्या लॉकरचे शुल्क १,५०० रुपयांवरून २,००० खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता चुकल्यास दंड

२५० रुपये फक्त तीन वेळा पैसे जमा करता येणार, त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी ५० रुपये शुल्क


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.